-1.5 C
New York

Hemant dhome : ‘रोज उठून नवा इतिहास सांगणाऱ्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे’ सोलापूरकरांच्या वक्तव्यावर हेमंत ढोमेचं ट्विट

Published:

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहासाबाबत राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तक्य केलं. वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. यावरुन राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या. अशातच आता राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण सोलापूरकरांनी दिलं आहे. दरम्यान या प्रकरणावर अभिनेते आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी एक ट्विट केलं. त्यात ते असं म्हणाले की,”दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी एक ट्विट केलं. त्यात ते असं म्हणाले की,”इतिहासाला त्याच्या जागी राहूद्या! आम्हाला आमच्या महाराजांच्या “रंजक” गोष्टींमध्येच रमूद्या! रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात! असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे! उगच सगळे सोलापूरकर बदनाम होतात! जय शिवराय !”

Sanjay Raut : ‘महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ वेड्यांचा आणि अंधश्रद्धावाल्यांचा बाजार’ राऊतांची खोचक टीका

राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगावर भाष्य करत एक नवा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा पेटारे बिटारे काही नव्हते.‌ चकलाच देऊन ते आले आहेत. त्यासाठी किती हुंडा वठवला त्याचेही पुरावे आहेत.‌ अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाज दिली होती. मोहसीन खान ही मोईन खान असं नाव आहे त्याच्याकडूनच अधिकृत शिक्के परवाने घेऊन ते सगळे बाहेर पडलेले. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटी निघाले. त्यांच्या परवानाची खून सुद्धा उपलब्ध आहे. गोष्टी रुपात करताना मग ते सगळं लोकांना जरा रंजक करून सांगावं लागतं. रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी छेद मिळतो किंवा बाजूला टाकला जातो मग खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलाच जात नाही… महाराजांच्या शिस्तीचे मोठेपण म्हणून रचलेली कथा म्हणजे गडाचे दरवाजे सूर्यास्त नंतर बंद व्हायचे. याच्यातून निर्माण झालेली हिरकणी ही कथा. हिरकणी घडलेलीच नाही.मी रायगडावर फिल्म केली आहे पण तिथे हिरकणी असं काही नाही. असा इतिहास नाही पण ते लिहिले गेले आहे. रंजकतेच्या नावाखाली खरा इतिहास आणि खरे शिवाजी समजत नाही…”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img