राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे हे सध्या सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चांगलेच चर्चेत आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली आहे. यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा मागणी अगदी कसून धरली आहे. यानंतर आता त्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढलेल्या राजाभाऊ श्रीराम फड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अरुण आर. पेडणेकर यांनी प्रतिवादींसह मंत्री धनंजय मुंडे व इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या निवडणूक याचिकेवर 20 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती दडविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Dada bhuse On Sanjay Raut : ‘राऊतांना डॉक्टरांना दाखवावे लागेल’, राऊतांच्या टीकेला भुसेंचं उत्तर
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.त्यांना या शस्त्रक्रियेनंतर विश्रांतीचा सल्ला दिला आहे. “माझ्या डोळ्यावर आज मुंबई येथे पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने सर यांच्या खाजगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पुढील चार ते पाच दिवस काळजी व विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कृपया मला भेटता येणार नाही. सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेल,”अशी माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: जनतेला दिली आहे.