-1.5 C
New York

Delhi Election 2025 : आज दिल्लीतील ७० जागांसाठी मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

Published:

दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान प्रक्रिया होत आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.  निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ६९९ उमेदवारांचे भवितव्य १ कोटी ५६ लाखांहून अधिक मतदार ठरवणार आहेत. आज एकूण ७० विधानसभा जागांसाठी मतदान पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावे यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.  दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.भाजप, कॉंग्रेस आणि आप असी तिरंगी लढत दिल्लीत होणार असून येत्या ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचे निकाल हे स्पष्ट होईल. या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) यांनी नवी दिल्लीतील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयात मतदान केले. गांधीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अरविंदर सिंह लवली (Arvindar Singh) यांनी मतदान केले.आप नेते आणि जंगपुरा विधानसभा मतदारसंघातील आमदार उमेदवार मनीष सिसोदिया (Manish sisodiya) यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील लेडी इर्विन वरिष्ठ माध्यमिक शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान केले. संपूर्ण राजधानीत सुमारे ८० हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही नजर ठेवली जात आहे. राजधानीतील १३ हजार ७६६ मतदान केंद्रांच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे ४५ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img