-2.5 C
New York

Dada bhuse On Sanjay Raut : ‘राऊतांना डॉक्टरांना दाखवावे लागेल’, राऊतांच्या टीकेला भुसेंचं उत्तर

Published:

शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी ‘महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे वेड्यांचा आणि अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे. मी सुद्धा पत्रकार आहे. लोक मला काही गोष्टी सांगतात. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर रहायला जावं, ते त्यांचं अधिकृत निवासस्थान आहे. आमचे मुख्यमंत्री जात नाहीयत, ते ताक फुंकून पितायत असं मला दिसतय.’ अशी टीका केली होती. त्यावर मंत्री दादा भूसे यांनी संजय राऊतांवर शाब्दिक ताशेरे ओढले आहेत.

नागपूर मध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना खासदार संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारला असता, ”संजय राऊतांना ठाण्यातील दाडीवाल्या डॉक्टरांना दाखवावे लागेल, दररोज काहीतरी विचित्र बोलतात आणि विषय चर्चेसाठी देण्याचं काम ते करतात. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.” अशी टीका मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. ‘आज विभागातील सर्व जिल्ह्याच्या बैठक होतील, येणाऱ्या काळात बैठका घेऊन पुढे जाणार आहोत. कळमेश्वर, नगर पालिका, जिल्हा परिषद उबाळी, आणि नागपूर मनपच्या हिंदी शाळेला भेट दिली. पीएम श्री शाळा ही अतिशय चांगली असल्यानं त्या शिक्षकांच अभिनदंन केले, वैदकीय तपासणी मुलांची झाली असून, त्यांचे उपचार करणे चालू आहे.मुलांना दिला जाणारा पोषण आहार खेळांचे मैदान, या सोयी सुविधा देऊ.’ असं देखील मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं.

Sanjay Raut : ‘महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ वेड्यांचा आणि अंधश्रद्धावाल्यांचा बाजार’ राऊतांची खोचक टीका\

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ छगन भुजबळ यांच्या पक्षप्रवेशाबाबत ‘लोकशाहीत ज्याचा त्याचा व्यक्तिगत अधिकार आहे, कुठे जावं, कोणाला प्रवेश द्यावा हा त्याचा अधिकार आहे.’ असं ही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img