6.6 C
New York

Cancer : रोजच्या ‘या’ सवयींनी मिळतंय कॅन्सरला आमंत्रण; जाणून घ्या

Published:

भारतात सध्या कॅन्सरचे प्रमाण (Cancer) अतिशय वेगाने वाढत चालले आहे. तरुण वयातही अनेकांना या गंभीर व्याधीने ग्रासले आहे. कॅन्सर होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये काही कारणे आपल्या रोजच्या सवयींमध्ये दडली आहेत. आपल्या रोजच्या जीवनात अशा काही सवयी असतात ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका निश्चित वाढत (World Cancer Day) जातो. याबाबत आज जागतिक कॅन्सर दिनानिमित्त वैद्यकीय तज्ज्ञांची मते जाणून घेऊ या..

Cancer कोणत्या सवयींमुळे वाढू शकतो कॅन्सर

धूम्रपान कॅन्सरचे (Smoking) सर्वात मोठे कारण आहे. स्मोकिंगमुळे फुप्फुस, तोंड, गळा यांसह शरीराच्या अन्य अवयवांचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. सिगरेट, बिडी, तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादनांत कार्सिनोजेन्स असतात. ज्यामुळे शरीरातील पेशींना गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे शरीरात कॅन्सरच्या विकासाला पोषक स्थिती निर्माण होते.

मद्यपान

दारू पिण्यामुळे सुद्धा कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढतो. तोंड, गळा, लिव्हर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका यातून वाढण्याची शक्यता असते. दारूमध्ये इथेनॉल असते. इथेनॉल सुद्धा एक कार्सिनोजेन्स आहे. कमी प्रमाणात पिलेली दारू सुद्धा भविष्यात कॅन्सरचे कारण ठरू शकते.

अनहेल्दी डाएट

शरीरास अपायकारक खाद्य पदार्थ खाल्ल्याने देखील या आजाराचा धोका वाढू शकतो. अनहेल्दी डाएटमध्ये धान्य, फळे, भाजीपाला यांचा समावेश नसतो. फॅट, शुगर आणि प्रोसेस केलेले खाद्य पदार्थ जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. ज्यादा फॅट आणि साखरेचे सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. हाच लठ्ठपणा पुढे कॅन्सरचे कारण ठरू शकतो. प्रोसेस फूडमध्ये अपायकारक रसायने असतात. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

Cancer या गोष्टींमुळे सुद्धा वाढतो धोका

लठ्ठपणा

लठ्ठपणा अनेक (Obesity) प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढवतो. ब्रेस्ट, युटेरस, कोलोन आणि किडनीच्या कॅन्सरचा धोका वाढतो. लठ्ठपणा शरीरात सूज आणि हार्मोनल बदलांचे कारण बनतो. यामुळे शरीरात कॅन्सरचा विकास होण्याची शक्यता वाढते.

शारीरिक हालचालींचा अभाव

नियमितपणे शारीरिक व्यायामाच्या अभावामुळे देखील कॅन्सरचा धोका वाढू शकतो. व्यायाम शरीरातील इम्युनिटी सिस्टीम अधिक मजबूत करतो. तसेच शरीराला हेल्दी ठेवण्यास मदत करतो.

सूर्यापासून निघणारी हानिकारक किरणे त्वचेच्या कॅन्सरचे कारण बनू शकतात. दीर्घ काळ उन्हात राहिल्याने स्किन कॅन्सर (Skin Cancer) होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही संक्रमण जसे की ह्युमन पेपीलोमा व्हायरस (एचपीव्ही) आणि हिपॅटायटीस बी आणि सी कॅन्सरचे कारण बनू शकतात. एचपीव्ही सर्वायकल कॅन्सरचे कारण बनू शकतो. तर हिपॅटायटीस बी आणि सी मुळे लिव्हरच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

वायू, जल प्रदूषण

वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण (Air Pollution) यांमुळे कॅन्सरचा धोका वाढतो. प्रदूषित हवा आणि पाण्यात शरीराला नुकसानदायक केमिकल असतात. यामुळे शरीरातील पेशींना नुकसान होऊ शकते. यामुळे शरीरात कॅन्सरच्या विकासाला चालना मिळते. तसेच काही केमिकल्समुळेही कॅन्सरचा धोका वाढू शकतो. एसबेस्टस, बेंजीन आणि काही प्रकारचे पेस्टीसाईड्स सारखे केमिकल कॅन्सरला जन्म देऊ शकतात.

कॅन्सर कसा टाळाल..

या सवयी बदलून किंवा पूर्ण बंद करून कॅन्सरचा धोका निश्चित कमी करता येऊ शकतो. स्मोकिंग बंद करणे, चांगले आणि सकस अन्न खाणे, नियमितपणे व्यायाम करणे, हेल्दी वजन टिकवणे आणि सूर्याची किरणे अतिप्रमाणात शरीरावर पडू न देणे यांमुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img