6.6 C
New York

Latest News Updates : राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Published:

शिवसेना ठाकरे गटाचे सुरज चव्हाण यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

शिवसेना ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना मुंबई हायकोर्टाने कथित खिचडी घोटाळ्यात एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

कृषीमंत्रीच शेतकऱ्यांचे पैसे खातो, मुंडेंवर ८८ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे खातो. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना ८८ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय.

 वैभव नाईक यांच्या संपत्तीची एसीबीकडून चौकशी

शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नीला एसीबीकडून नोटीस जारी करण्यात आली असून संपत्तीची चौकशी करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पानंतर मुंबई महापालिका आज अर्थसंकल्प सादर करणार

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आता मुंबई महापालिका आज ४ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. सकाळी ११ वाजता मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे पालिका मुख्यालयात अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

 सरकारी कार्यालयांत आता केवळ मराठीचे बोल

मुंबई : राज्यात गेल्या वर्षी नव्याने आखण्यात आलेले ‘मराठी भाषा धोरण’ केवळ बासनात बांधले जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने मराठी भाषा व्यवहारात आणण्यासाठी स्वत:पासूनच सुरुवात केली आहे. मंत्रालयापासून जिल्हा पातळीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयांत मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारी कार्यालयात मराठी भाषेत संवाद न साधणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मराठीत बोलत नसल्याची तक्रार आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

 पंतप्रधान मोदी 12 फेब्रुवारीला पॅरिसहून वॉशिंग्टनला जाणार, १३ फेब्रुवारीला शिखर परिषद होण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर पंतप्रधान मोदी आता १२ फेब्रुवारीला पॅरिसहून वॉशिंग्टनला जाणार आहेत. त्यांचे अधिकृत कार्यक्रम पुढील दोन दिवसांत जाहीर होतील. १३ फेब्रुवारी रोजी शिखर परिषद होण्याची शक्यता आहे.

वाल्मीक कराडला आज न्यायालयात हजर करणार,जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता

आज वाल्मीक कराडची न्यायालयीन कोठडी संपणार असल्याने त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यावेळी तो जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

  मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार

मुंबई महापालिकेचा 2025-206 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज, 4 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी आज काय मोठ्या घोषणा केल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img