-0 C
New York

Rupee : डॉलरच्या तुलनेत रूपया 87 वर, ट्रम्पच्या टॅरिफमुळे जागतिक बाजारपेठेत मोठी घसरण

Published:

विक्रमी नीचांकी पातळीवर भारतीय रुपया (Rupee) घसरल्याचं समोर आलंय. अनेक देशांवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कर लादले, त्यानंतर रूपया घसरल्याचं समोर आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर कर लादल्यानंतर डॉलर (US Dollar) निर्देशांकात वाढ झाली. त्यानंतर आज सुरुवातीच्या व्यापारात भारतीय रुपया विक्रमी नीचांकी (Trumps Tariffs) पातळीवर घसरला. भारतीय चलन सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 87.11 वर विक्रमी नीचांकी पातळीवर घसरले, जे मागील बंदच्या वेळी ग्रीनबॅकच्या तुलनेत 86.61 होते.

सहा प्रमुख जागतिक समकक्षांच्या तुलनेत अमेरिकन चलनाचे मूल्य मोजणारा डॉलर निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात 109.25 वर पोहोचला, तो मागील सत्रात 108.370 होता. ट्रम्प टॅरिफमुळे जागतिक बाजारपेठेचा नाश होत आहे. त्यामुळे जोखीम टाळण्यामुळे सोने आणि क्रिप्टोसह सर्व मालमत्तांवर परिणाम होत असल्याने भारतीय रुपया सर्वात कमी पातळीवर घसरला आहे. स्विस फ्रँक आणि जेपीवाय सर्व मालमत्ता घसरल्याने रुपया 87.20 पर्यंत घसरलाय, असं फिनरेक्स ट्रेझरी अॅडव्हायझरी एलएलपीचे ट्रेझरी प्रमुख आणि कार्यकारी संचालक अनिल कुमार भन्साळी म्हणाले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 31 जानेवारी रोजी सांगितलं की, ते 1 फेब्रुवारीपासून मेक्सिको आणि कॅनडामधून आयात केलेल्या वस्तूंवर 25 टक्के आणि चीनमधून आयात केलेल्या वस्तूंवर 10 टक्के कर लादतील. अमेरिका आणि काही देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू झालंय. याचा परिणाम इतर देशांवर होताना दिसतोय. कॅनडा आणि मेक्सिकोवर टॅरिफ लादण्याची घोषमा अमेरिकेने केलीय. तर कॅनडा अन् मेक्सिकोनं देखील अमेरिकेवर टॅरिफ लादलंय. यामुळे भारताच्या रूपयात मोठी घसरण झालीय. सोबतच कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंडच्या चलनात देखील मोठी घसरण झालीय.

डॉलरच्या तुलनेत रुपयाने पहिल्यांदाच 87 चा आकडा पार केलाय. मागील काही महिन्यात रुपयाची मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याचं दिसत आहे. आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी रुपया 87 रुपयांपर्यंत मार्च महिन्यापर्यंत घसरेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्याच दिवशी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयानं नीचांकी पातळी गाठलीय. डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी 86.61 वर बंद झाला होता. तर, आज 87 प्रति डॉलरवर रुपया व्यवहार करत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img