-0 C
New York

Rahul Gandhi : लोकसभेत राहुल गांधींनी सरकारला पद्धतशीर घेरलं

Published:

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliament Budget Session 2025) आज तिसरा दिवस आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावर चर्चा झाली. याशिवाय भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील संसदेची संयुक्त समिती (JPC) वक्फ दुरुस्ती विधेयकाशी संबंधित अहवाल आणि पुरावे सादर करणार आहे. लोकसभेत आज (Rahul Gandhi) राहुल गांधींनी सरकारला (Modi Goverment) पद्धतशीर घेरलंय. ‘मेक इन इंडिया’ संकल्पना फेल झाल्याचा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मॅन्युफॅक्चरिंग 60 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आहे. मेक इन इंडियाचा उल्लेख करत त्यांनी फोन दाखवला आणि सांगितलं की, तो भारतात बनवला आहे असे जरी म्हणत असलो तरी त्याचे पार्ट्स चीनमधून आले आहेत. ते इथे असेंबल केले आहेत. ते म्हणाले की, जग पूर्णपणे बदलतंय. आम्ही पेट्रोलियमपासून बॅटरी आणि अणुऊर्जेकडे वाटचाल करत आहोत. सर्व काही बदलत आहे. मागच्या वेळी जेव्हा क्रांती झाली, तेव्हा भारत सरकारने संगणक क्रांती पाहिली होती. त्यावर लक्ष केंद्रित केले होते. आज त्याचा परिणाम दिसून येत आहे.

युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. इलेक्ट्रिक मोटर आणि इंजिन बनवलंय. राहुल गांधींनी रोबोट्सपासून ड्रोनपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला आणि सांगितलं की आज लोक एआयबद्दल बोलत आहेत. एआय डेटावर कार्य करते. डेटाशिवाय हे काहीच नाही. प्रश्न असा आहे की, एआय कोणता डेटा वापरत आहे? भारताकडे कोणतीही आकडेवारी नाही. एकतर AI चीनी किंवा अमेरिकन डेटा वापरेल. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मेक इन इंडियाबद्दल जे बोलले, ती चांगली कल्पना आहे. पण उत्पादनात अपयश येत आहे. आम्ही पंतप्रधानांना दोष देत नाही, त्यांनी प्रयत्न केला, कल्पना योग्य होती पण ते अपयशी ठरत आहेत.

गेल्या 60 वर्षात किमान पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत, कोणताही देश उपभोग आणि उत्पादन या दोन गोष्टींवर चालतो. 1990 पासून सर्व सरकारांनी उपभोगावर चांगलं काम केलंय. रिलायन्स, अदानी, टाटा, महिंद्रा या सर्वांचा झपाट्याने विकास झाला पण एकूणच देशाचा विकास झाला नाही. तरूणांना रोजगार देण्यात काय अडचण आहे, याचा शोध यूपीए किंवा एनडीए सरकारला आजतागायत सापडला नाही. आजही ते शोधू शकले नाहीत, असं देखील राहुल गांधी म्हणालेत.

या देशातील तरुणांना संबोधित करत राहुल गांधी म्हणाले की, देशात क्रांती येणार आहे. आम्ही पेट्रोलवरून इलेक्ट्रिक मोटरवर स्विच करत आहोत. युद्ध, वैद्यकीय उपचार, शिक्षण, सर्वकाही बदलत आहे. यात चीन आपल्यापेक्षा 10 वर्षे पुढे आहे. परराष्ट्रमंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, आम्ही आमच्या पंतप्रधानांना निमंत्रण देण्यासाठी अमेरिकेला पाठवत नाही.

चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी ते फेटाळून लावले. पण लष्कराने सांगितलं की, चीनच्या ताब्यात चार हजार चौरस किलोमीटर जमीन आहे. त्यावर आक्षेप घेत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगितलं. लष्करप्रमुखांच्या वक्तव्याचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, चीन आपल्या देशाच्या जमिनीवर कब्जा करत आहे. ही वस्तुस्थिती आहे. युद्ध औद्योगिक व्यवस्थेवर अवलंबून आहे. त्यात ते आपल्या पुढे आहेत. यामुळेच चीन येथे बसलाय आणि मेक इन इंडिया अपयशी ठरत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केलीय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img