प्रतिनिधी : रमेश तांबे
ओतूर : प्रवासाच्या बहाण्याने इरटीगा कारमध्ये बसून, कारचालकास मारहाण करत त्याचा खून करणारी सराईत आंतरजिल्हा टोळीच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. सदरची कारवाई पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे केली आहे.
राजेश बाबुराव गायकवाड, वय ५६ वर्षे रा. निधी अपार्टमेंट जेलरोड, नाशिक, ता.जि.नाशिक असे खून झालेल्या कार चालकाचे नाव आहे.
याबाबत अंकुश राजेश गायकवाड, वय ३० वर्षे, रा. निधी अपार्टमेंट जेलरोड, नाशिक, ता.जि.नाशिक यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे.
१) विशाल आनंदा चव्हाण वय २२ वर्षे, रा. गंगापूर रोड, बिगबाजार बँकसाईट, महेश अपार्टमेंट कॉलेज रोड, नाशिक, २) मयुर विजय सोळसे, वय २३ वर्षे, गंगापूर रोड, गोकुळवाडी श्रीरंगनगर, नाशिक, ३) ऋतुराज विजय सोनवणे, वय २१ वर्षे, रा.गंगापूर रोड, विदया विकास सर्कल, गोकुळवाडी, नाशिक अशी आरोपींची नावे आहेत.
Pimpari-Chimchawad : संभाजी ब्रिगेडच्या वतीने संत तुकाराम महाराजांची जयंती उत्साहात साजरी
राजेश गायकवाड हे दि.२७ जानेवारी रोजी नाशिक येथून त्यांचे ताब्यातील इरटीगा कार नं.एम.एच. १५ जे.डी. ५१९३ ही घेवून पुणे येथे गेले होते. रात्रौ साडेदहा वाजण्याच्या सुमारास राजेश गायकवाड यांचे फोनवरून फिर्यादीच्या आईच्या फोनवर फोन आला व राजेश गायकवाड यांचा फोन पुणे-नाशिक हायवेलगत संतवाडी रोडवर मिळाला असून फोन समाधान हॉटेल येथे आहे. या माहितीचे आधारे फिर्यादी व कुटुंबीय हे आळेफाटा येथे आले त्यांनी राजेश गायकवाड यांचा शोध घेतला, ते मिळून न आल्याने दि.२८ रोजी राजेश गायकवाड हरविल्याची हे खबर नोंदविणेत आली. त्यानंतर साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान आळे संतवाडी परिसरात राजेश गायकवाड यांचा मृतदेह मिळून आला त्यांचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेले होते. सदर परिस्थीतीवरून वरील प्रमाणे अनोळखी व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक व आळेफाटा पोलीस स्टेशनच्यातपास पथकाचे मदतीने तपास सुरू करून मृतदेह मिळून आलेल्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, नाशिक ते पुणे लेनलगतचे हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये मयत राजेश गायकवाड यांचेकडील इरटीगा कार ही विरूद्ध दिशेने येवून मृतदेह मिळून आलेल्या ठिकाणी गेली व पुन्हा मागे आळेफाटा बाजूकडे जावून माळशेज घाटाकडे गेली होती. तपासा दरम्यान राजेश गायकवाड यांची इरटीगा कार चाळकवाडी टोलनाक्यावरून नाशिक कडे जाताना कार मध्ये त्यांचेव्यतिरीक्त आणखी दोन इसम बसलेले होते व एका व्यक्तीचे डोक्यात पांढरे रंगाची कॅप होती. त्याद्वारे चाकण चौकातील नाशिककडे जाणारे गाडीतळावर जावून चौकशी केली असता, पांढरे रंगाची कॅप घातलेल्या इसमा सोबत इतर तीन व्यक्ती असल्याचे आढळून आले.
Rupee : डॉलरच्या तुलनेत रूपया 87 वर, ट्रम्पच्या टॅरिफमुळे जागतिक बाजारपेठेत मोठी घसरण
दरम्यान इरटीगार कार ही कसारा घाटात मिळून आल्याने सदरचे आरोपी हे नाशिक परिसरातीलच असावेत असा संशय बळावल्याने पथकाने त्या परिसरातील गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळविली असता, सदर गुन्हयातील फुटेज मधील व्यक्ती ही युवराज मोहन शिंदे, रा. सातपूर जि. नाशिक व विशाल आनंदा चव्हाण रा. गंगापूर-कॉलेज रोड नाशिक हे असून त्यांनी सदरचा गुन्हा’ केला असलेबाबत माहिती मिळाली. माहितीचे आधारे संशयितांचा शोध घेतला असता, सदरचे आरोपी पुन्हा गुन्हा करणेसाठी कल्याण बाजूकडून ओतूर बाजुकडे येत असलेबाबत माहिती मिळाल्याने माळशेज घाटाजवळ सापळा लावून दि. ३१ रोजी आरोपी १) विशाल आनंदा चव्हाण वय २२ वर्षे, रा. गंगापूर रोड, बिगबाजार बँकसाईट, महेश अपार्टमेंट कॉलेज रोड, नाशिक, २) मयुर विजय सोळसे, वय २३ वर्षे, गंगापूर रोड, गोकुळवाडी श्रीरंगनगर, नाशिक, ३) ऋतुराज विजय सोनवणे, वय २१ वर्षे, रा. गंगापूर रोड, विदया विकास सर्कल, गोकुळवाडी, नाशिक अशी असल्याचे सांगितले, त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी नाशिक जाण्यासाठी प्रवासी म्हणून कार मध्ये बसले आणि आळेफाट्याजवळ राजेश गायकवाड यांचा कारमध्येच गळा आवळून खून करून त्यांचा मृतदेह टाकून देवून कार घेवनू निघून गेले असल्याचे सांगितले.
आरोपींना विश्वासात घेवून चौकशी करता यातील मुख्य आरोपी नामे युवराज मोहन शिंदे याने यापुर्वी त्याचे इतर साथीदारांचे मदतीने अशा प्रकारे गुन्हे पद्धतीचा अवलंब करून एक इरटीगा कार जबरदस्तीने चोरून नेली असून त्याबाबत चाकण पोलीस स्टेशनमध्ये आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
सदरचे आरोपी हे सराईत असून आरोपी विशाल चव्हाण व मयुर सोळसे यांचेवर गंगापूर (नाशिक) पोलीस स्टेशनमध्ये रजि. ३७/२०२२ भादंवि ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद असून आरोपी युवराज मोहन शिंदे याचेवर मालमत्ता चोरी व शरिराविरूद्धचे चार गुन्हे दाखल आहेत.
ISRO : इस्रो’च्या 100 व्या मोहिमेला धक्का; ‘एनव्हीएस०२’ उपग्रहामध्ये आले तांत्रिक अडथळे
सदर आरोपीना मा. न्यायालयात हजर केले असता, दि.७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली असून पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा हे करीत आहेत. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे,
स्था.गु.शाखेचे सपोनि कुलदीप संकपाळ, पोलीस सब इन्स्पेक्टर अमित सिदपाटील आळेफाटा पो स्टे चे सपोनि अमोल पन्हाळकर, पोसई चंद्रशेखर डुंबरे, स्था.गु.शा.चे अंमलदार दिपक साबळे, राजु मोमीण, संदिप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, आळेफाटा पोस्टेचे अंमलदार विनोद गायकवाड, अमित माळुंजे, सचिन कोबल, गणेश जगताप, ओकार खुणे, यांनी केली आहे.