धुळ्यात थंडीचा जोर अद्यापही कायम
धुळ्यात थंडीचा जोर अद्यापही जाणवत असून आज धुळ्यात 10.5° अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे, गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उन्हाचा कडाका आणि रात्री थंडीचा जोर वाढला असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे धुळेकर नागरिकांना गर्मी व थंडीचा दोघांचाही अनुभव येत आहे,
राज्यात इतरत्र थंडीचा जोर कमी झालेला असताना धुळ्यात मात्र अद्यापही गारठा कायम असल्याचे दिसून येत आहे.
कृष्णा नदीवर आयर्विन पुलाला बांधण्यात येणारया समांतर पुलाचे काम रखडले
सांगली शहरातल्या कृष्णा नदीवर आयर्विन पुलाला समांतर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम,गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला आहे. जिल्हा शासनाचे आणि बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पुलाचे काम लवकर पूर्ण कारावी अशी मागणी नागरिकां मधून होत आहे. आयर्विन पुलाला समांतर आणि पर्यायी पूल म्हणून कृष्णा नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या काळात पुलाच्या कामाचे उद्घाटन झाले होते. मात्र 3 वर्ष उलटून देखील अद्याप पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नसून संथ गतीने सुरू आहे. लवकर पूल चालू करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
लोणावळ्याच्या वेहरगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई, दहा जणांवर गुन्हा दाखल..
पुणे ग्रामीण पोलीस दलाने संकल्पनाशा मुक्ती अभियान अंतर्गत वेहरगाव येथे मटका अड्ड्यावर मोठी कारवाई केली. वेहरगाव येथील संतोष बोत्रे यांच्या पडीत जमिनीवर काही व्यक्ती कल्याण मटका खेळत आहेत या माहितीच्या आधारावर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने छापा टाकला आणि मटका खेळणाऱ्या सह मटका घेणाऱ्या दहा जनावर कारवाई केली. या छापा मारीत पोलिसांनी एकूण एक लाख 64 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटरसायकल, पावती पुस्तके, आणि मोबाईल फोन याचा समावेश आहे. पोलिसांच्या यशस्वी कामगिरीमुळे विहारगाव परिसरात मटका खेळणाऱ्या वर आणि घेणाऱ्यावर कठोर कारवाई केली गेली आहे. पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीमुळे जुगार अंड्याचे नेटवर्क तोडण्यात यश आले आहे.
वाल्मिक कराडची सांगलीतील घोटाळयाप्रकरणी चौकशी करा – स्वाभिमानी स्वराज सेनेचे मागणी..
बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकते असणाऱ्या वाल्मिक कराड याची सांगलीतील स्वाभिमानी स्वराज सेनेकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलं आहे.सांगलीतील एका तत्कालीन कृषी अधिकारी मुकुंद जाधवर याच्या घोटाळ्या प्रकरणी आंदोलन केल्यानंतर आपल्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल झाला होता,सदर गुन्हा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक जोशी यांच्या दबावातून दाखल केल्याचा आरोप देखील स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी केला आहे.
राज्यात पहिल्यांदाच सामाजिक वॉररूम उभारण्यात येणार
सामाजिक वॉररुम याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याविषयी मंत्रालय बैठक घेणार आहेत
या वॉररूम मधून केद्र सरकार , राज्य सरकार योजना तसेच समाजिक उपक्रम याचा आढावा घेतला जाणार
या अगोदर पायाभूत प्रकल्प साठी आढावा साठी वॉररूम तयार करण्यात आली होती
या प्रकल्प तसेच सामाजिक क्षेत्र यासाठी अश्या दोन वॉररूम असणार
ज्या योजना थेट जनतेशी निगडीत आहेत अशा योजनांचा आढावा सामाजिक वॉररूम म्हणून घेतला जाईल.
उमरगा येथील एमएसईबीच्या कार्यालयाकडून बस स्थानकातील स्वच्छालयास लावले कूलूप
धाराशिवच्या उमरगा बस स्थानकातील स्वच्छालयाच्या दुर्गंधीमुळे ञास होत असल्याने शेजारी असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या स्वच्छालयास कूलूप लावून बस स्थानकातील स्वच्छालय बंद केले आहे.दरम्यान या स्वच्छलयाची स्वच्छता करण्याची वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केल जात असल्याने एमएसईबी च्या कर्मचाऱ्यांनी या स्वच्छलयाला कुलुप लावले आहे.