आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी बजेट (Budget 2025) सादर केलं. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचं (NDA Government) हे पहिलं पूर्ण बजेट होतं. त्यामुळे देशातील जनतेबरोबरच सरकारमधील घटक पक्षांचंही बजेटकडे लक्ष होतं. अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी या बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या.
आयकराबाबतही मोठी घोषणा केली. 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर द्यावा लागणार नाही अशी मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली. परंतु, याबरोबरच त्यांनी देशात एक नवीन आयकर कायदा तयार करण्यात येणार असल्याचेही सांगितले. पुढील आठवड्यात यासाठी केंद्र सरकार एक नवीन विधेयक आणणार आहे.
देशात सध्या आयकर कायदा 1961 लागू आहे. सन 2020 मधील अर्थसंकल्पात सरकारने याच कायद्यांतर्गत नवीन टॅक्स रिजीम लागू केले होते. नंतर जुलै 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सरकारने देशात आयकर कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट म्हटले होते. यासाठी एक समितीही नियुक्त करण्यात आली होती. आता याच आधारावर नवीन विधेयक आणणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यानंतर जो नवा कायदा तयार होईल तो आधीच्या आयकर कायदा 1961 ची जागी घेईल.
Budget 2025 आयकर कायद्यात काय खास?
या नव्या आयकर कायद्यात काय असेल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. परंतु, यातील सहा मुख्य घटकांबाबत सरकारने संकेत दिले आहेत. रेग्युलेटरी रिफॉर्म हा त्यातील एक घटक आहे. देशात रेग्युलेशन अधिक सोपे करण्याचा उल्लेख काल सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणातही होता. यामुळे नव्या कायद्यात सरकार करात सरळीकरण करील अशी चिन्हे दिसत आहेत.
Budget 2025 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री
अर्थमंत्र्यांनी नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला. या घोषणेनुसार आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. या व्यतिरिक्त करदात्यांना 75 हजार रुपयांच्या मानक वजावटीचा लाभ मिळणार आहे. या घोषणेनुसार आता 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. यानंतरच्या उत्पन्नावर ठराविक दराने कर भरावा लागणार आहे. हा कर किती असेल याचे प्रमाणही अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सांगितले.
Budget 2025 किती बदलला टॅक्स
0 ते 12 लाखांपर्यंत – शून्य कर
12 ते 16 लाखांपर्यंत – 15 टक्के आयकर
16 ते 20 लाखांपर्यंत – 20 टक्के आयकर
20 ते 24 लाखांपयर्यंत – 25 टक्के आयकर
24 लाखांपेक्षा जास्त 30 टक्के आयकर