सोन्याच्या दराने अर्थसंकल्पाच्या (Gold Prices) पूर्वसंध्येला नवीन विक्रम केला आहे. मागील वर्षी अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्यात आलं होतं. त्यामुळे सोन्याचे (Budget) दर प्रतिदहा ग्रॅम चार हजार रुपयांनी घसरले होते. तेव्हा सोन्याचे दर ७३ हजार रुपये दर होता. घसरणीनंतर तो ६८ हजारांवर आला होता. चांदीच्या दरातही घसरण झाली होती.
आज शहरात सोन्याचा भाव २४ कॅरेटसाठी ८२ हजार ४०० रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. काल ३० जानेवारीला सोन्याचे दर ८१ हजार ६०० रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत पोहोचला होता. सोन्याच्या दरात ८०० रुपयांची वाढ होऊन नवा विक्रम केला आहे.
अर्थसंकल्पात सोन्यावर सीमा शुल्क वाढवले जाऊ शकतो. यामुळे आयात महाग होईल. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, सराफा व्यापाऱ्यांनी सोन्यावरील आयात शुल्क सहा टक्क्यावरुन एक टक्का कमी करणे, दागिन्यांवरील जीएसटी तीन टक्क्यावरुन एक टक्का करणे.
जुन्या दागिन्यांच्या नोंदणीकृत विक्रेत्याला विक्रीसाठी ३ महिन्यांसाठी भांडवली नफ्यात सूट द्यावी, क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्वीप करण्यासाठी एमडीआर शुल्क रद्द करावे, दागिने उद्योगासाठी रोख व्यवहार मर्यादा दोन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवणे, सोने व्यापारावर फक्त नोंदणीकृत डीलरसाठी परवानगी देण्यात यावी.
ग्राहकांना सोन्याचे दागिने खरेदी करताना मासिक शुल्क सुविधा सुरु करावी, अशी मागणी सराफा असोसिशनची आहे. यावर अर्थसंकल्पात तरतूद झाल्यास सोन्याचे दर कमी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.