केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष (Budget 2025) 2025-26 साठी सलग आठवा अर्थसंकल्प सादर केलाय. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्यात. अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी विशेष घोषणा केलीये. या अर्थसंकल्पात महिला आणि शेतकरी या घटकांकडे विशेष लक्ष देण्यात आलंय.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मागास वर्गातील महिलांसाठी विशेष योजनेची घोषणा (Anouncement For Woman) केलीय. या योजनेतंर्गत ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे लक्ष दिलं जाणार आहे. 5 लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 च्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील 5 लाख महिलांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत या सोसायटीतील महिलांना 2 कोटी रुपयांचे मुदत कर्ज देण्यात येणार आहे, ज्या पुढील 5 वर्षांत प्रथमच उद्योजक बनणार आहेत. स्टँडअप इंडिया योजनेतून मिळालेल्या लाभांचा देखील या योजनेत समावेश केला जाईल. ऑनलाइन व्यवसायाला प्रोत्साहन कसे द्यावे, व्यवस्थापकीय कौशल्ये विकसित करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जाणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलंय.
सहा वर्षांत खाद्यतेलाचं टेन्शन मिटणार! अर्थमंत्री सितारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा
रोजगाराच्या संधी आणि उद्योजकता वाढवण्यासाठी सरकार विशेष धोरण तयार करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. भारतातील पादत्राणे आणि चामड्याच्या क्षेत्रात गुणवत्ता, उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी फोकस उत्पादन योजना लागू केली जाईल. या योजनेमुळे 22 लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. तसेच, 4 लाख कोटी रुपयांचा महसूल आणि 1.1 लाख कोटी रुपयांहून अधिक निर्यात अपेक्षित आहे.
हा अर्थसंकल्प महिला, गरीब आणि मागासवर्गीय आणि मध्यमवर्गीयांसाठी विशेष असल्याचे सरकारनं यापूर्वीच सांगितलं होतं. अर्थसंकल्पात उद्योजकतेला चालना देण्यासाठी सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. मागील श्रेणीतील महिलांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतचा टर्म इन्शुरन्स हे याचे उदाहरण आहे. याशिवाय सरकारने नवीन लोकांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिलंय. त्यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये वाढ अपेक्षित आहे.