राखेमुळे परळी वैजनाथ (Rakh) शहरासह परिसरात होणाऱ्या प्रदूषणाबाबत पालकमंत्री असताना यापूर्वी कारवाई केली आहे. नियमाने राख उचलली जात नसेल, वाहतूक करताना ती झाकली गेलेली नसेल आणि प्रदूषणास कारणीभूत ठरत असेल तर कठोर कारवाई करू.
प्रदूषण होत असल्याचे दिसल्यास वाहतूक करणारा ट्रक मालक, चालक व जिथे ती राख जात आहे, त्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी तंबी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली. परळी वैजनाथ येथील औष्णिक वीज केंद्रातून बाहेर पडणारी राख प्रदूषणास कारणीभूत ठरत असून, या राखेची अवैध व असुरक्षितपणे होणारी वाहतूक नागरिकांच्या जिवाला धोका पोचवणारी ठरत आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या गुरुवारी (ता. ३०) बीडमध्ये आल्या असता त्यांना या राखेच्या धोकादायक वाहतूक व प्रदूषणाला आळा घालणार का? असा सवाल माध्यमांनी विचारला.
पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेंकडून आमदार धस यांचा आरोपांचं खंडन; म्हणाले
त्यावर त्या म्हणाल्या, यापूर्वी पालकमंत्री होते तेव्हा जिल्ह्यातील विशेषत्वाने परळीत सुरू असलेले राखेचे प्रदूषण रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. कुठेही जाताना आपणास राखेचा उघडा ट्रक दिसला तर त्वरित थांबवून संबंधितांवर गुन्हा दाखल करीत होते.
आताही मी तेच करणार आहे. राख ही नियमाने, विशिष्ट पद्धतीने झाकून उचलली जावी. राखेमुळे कुठेही प्रदूषण होत असल्याचे दिसले तर ज्याचा ट्रक आहे त्याच्यावर, चालकावर आणि ती राख ज्याच्याकडे चालली आहे, अशा सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल.