मुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मराठी (Marathi) साहित्य संमेलन होतय त्याचाही मोठा अभिमान आहे. दरम्यान, संमेलनावरून वाद निर्माण झाला असं म्हटलं जात. परंतु, वाद निर्माण नाही झाला तर साहित्य संमेलन होऊच शकत नाही. त्यामुळे वादविवाद निर्माण होणच खर पोषक वातावरण आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टोलेबाजी केली. ते पुण्यात विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
Devendra Fadnavis वादाशिवाय संमेलन नाही
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उदय सामंत मगाशी सांगत होते की, काही लोकांनी वाद निर्माण केला. तुम्हाला मी सांगू शकतो की साहित्य संमेलन असो, नाट्यसंमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपला स्थायीभाव आहे. कारण आपण संवेदनशील लोक आहोत. इमोशनल लोक आहोत. त्यामुळे वाद, विवाद, प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होऊ शकते. हे मी म्हणत नसून आठव्या शतकात लिहिलेल्या पुस्तकात आहे.
Devendra Fadnavis दावोसचा किस्सा
जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही, जिथे माझा मराठी माणूस पोहोचलेला नाही. आम्ही जगभरात कुठेही जातो तर मराठी माणसे आमच्या स्वागताला तिथे असतात. दावोसला गेल्यानंतरही पाचशे आठशे किलोमीटरवरून मराठी माणसे माझ्या स्वागतासाठी आली होती. एकाचे मुरड्याने लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, हे इतकं सुंदर म्हणून दाखवलं. मला हे ऐकून इतका अभिमान वाटला की आपला मराठी माणूस तिकडे गेला तरी मराठी त्याच्यापासून दुरावली नाही. माय मराठी त्याच्या मनामध्ये आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.