आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. (Government Employee) त्यामुळे यावेळी फिटमेंट फॅक्टर २.८६ इतका लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे. या हिशोबाने कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये १८६ टक्क्यांची भरघोस वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, माजी वित्त सचिव सुभाष गर्ग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अशी वेतनवाढ अशक्य गोष्ट आहे.
Government Employee आठव्या वेतन आयोगामध्ये किती पगारवाढ?
माजी वित्त सचिव सुभाष गर्ग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर १.९२ वरुन २.०८ होण्याची शक्यता आहे. या हिशोबाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी किमान मुळ वेतन १० ते ३० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर २.५७ इतका होता. प्रत्यक्षात १४.२ टक्के वेतनवाढ झाली.
Government Employee १० ते ३० टक्के वाढ झाल्यास किती वेतन होणार?
जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचं किमान बेसिक वेतन १० टक्के वाढत असेल तर एकूण पगार ३० हजार ४२० रुपये इतका होईल. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान मूळ वेतन १८००० रुपये महिना आहे. त्यांना ५३ टक्के महागाई भत्ता मिळतो. आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन-तीन टक्क्यांचे महागाई भत्ते आणखी मिळतील. हा भत्ता वाढून ५९ टक्के होणार आहे.
आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगाचं किमान मूळ वेतन आणि महागाई भत्त्यांची बेरीज होईल. त्यामुळे जर १० टक्के वेतनवाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नव्या किमान मासिक वेतनाचं कॅलक्युलेशन असं असेल- १८०००+69%=३०,४२०. याचप्रमाणे जर ३० टक्के वेतनवाढीची शिफारस झाली तर नवीन वेतन ३४,०२० असं असेल.
Government Employee २.८६ चा फिटमेंट फॅक्टर कुठून आला?
आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यानंतर नॅशनल काऊन्सिल ऑफ ज्वाईंट कन्सलटेटिव्ह मशिनरीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितलं होतं की, नवीन वेतन आयोग कमीत कमी २.८६ च्या फिटमेंट फॅक्टरवर विचार करु शकतो. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये १८६ टक्के वाढ होईल. जर सरकार २.८६ च्या फिटमेंट फॅक्टरवर निर्णय घेणार असेल तर किमान मूळ वेतन १८००० रुपयांवरुन ५१,४८० रुपये होईल. निवृत्तवीवेतनधारकांची पेन्शन ९००० रुपयांवरुन २५ हजार ७४० इतकी होईल.