मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) काल त्याचं उपोषण स्थगित केलं. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याचं समोर आलंय. आज माध्यमांसोबत बोलताना जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या (Santosh Deshmukh) सर्व मारेकऱ्यांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी केलीय. काल
मंत्री धनंजय मुंडे यांनी काल भगवानगडावर मुक्काम केलाय. त्यांनी महंत नामदेव शास्त्रींसोबत (Mahant Namdev Shastri) चर्चा केली. नामदेव शास्त्री म्हणाले की, भगवानगड मुंडेंच्या पाठीशी आहे. ते गुन्हेगार नाहीत, मिडिया ट्रायल सुरू आहे. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ते एक मोठे महंत आहेत. राजकीय लोक डागळेलेले असतात. मात्र मला वाटत नाही ते बोलले असतील. त्यांना दोष देऊन जमणार नाही. जाणारे त्यांना शिकवत असतील, की असे बोला तसे बोला. त्यांना दोष देण्यापेक्षा जो गेला, तो जे करतो तो काही ऐकायला तयार नाही. विकृतपणाने केलेले कार्य याला समाज पाठीशी घालत नाहीर. समाजात प्रचंड उद्रेकाची लाट तयार झाली, तर समाज पाठीशी घालणार नाही.
गुंड थोडेच संप्रादाय चालवतात? गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय चालवतील, असं वाटत नाही. हे शिकवले असा संशय येतो.ते माणूसच वेगळे आहेत. बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले असतील तर.. दुरुस्त करतील.एक बाजू सांगितली तर पटत असते. फास लागायला लागला तर असे होऊ शकते. मला वाटत नाही त्यांच्यावर दबाव असेल, जे आहे ते रोखठोक आहे. जे आहे ते सडेतोड आहे. देशमुख यांची घटना मोठी त्याला पाठीशी घालू शकत नाही. गफलत असेल, राज्याचे मोठे दुर्दैव आहे. शेवटी महंत महंत आहेत. याला गुंड गिरीला प्रोत्साहन देणे असं म्हणतात.
मोठी बातमी! पंतप्रधान मोदी महाकुंभाला जाणार नाहीत, दौरा रद्द
बाबांजीकडून शब्द गेले असतील राज्याची मोठी हानी आहे. खून केल्याचा आनंद आहे का ? खून केलेल्यांना सोडुन द्या असा अर्थ होतो का? काय शिकावे शिकवणाऱ्याने, बाबाजीला दोष देऊन काय उपयोग? तुम्ही माणूस मारून टाकला, माणसाच्या रक्ताची दया मया नाही का? संतोष देशमुख यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे आहे. पूर्वीचे दुख देणारे हेच का? हीच का ती टोळी? बाबांनाही यात ओढतच आहे? धनंजय मुंडे कोणता सलोखा ठेवत आहेत? बाबाजींचा दोष नाही. न्यायची अपेक्षा न करणे फक्त गुंड सांभाळणे. त्यांची सर या गुंडाला नाही येणार. बलात्कार,खून असे करून स्वत:च्या जातीचे लोकांचे खून केले. पाप यांनी केलं, मात्र बाबाजी यांना पांघरून टाकायला लावलं का? गुंतणार सगळे, बाबाजींजवळ जावून पाप लपवू नये, असं देखील मनोज जरांगे यांनी सांगितलंय.