अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) पुन्हा एकदा ब्रिक्स देशांना स्पष्ट इशारा दिला आहे. अमेरिकी डॉलरऐवजी दुसऱ्या चलनाचा स्वीकार केला तर 100 टक्के टॅरिफ लावू असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर पोस्ट लिहीत ब्रिक्स देशांना सरळ शब्दांत इशारा दिला आहे की जर या देशांनी दुसरे चलन स्वीकारले तर अमेरिका या देशांची साथ नक्कीच सोडील. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेने भारताची डोकेदुखी वाढणार आहे. ब्रिक्स संघटनेत चीन आणि रशियाबरोबरच भारतही सदस्य देश आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा इशारा भारतासाठी नक्कीच चिंताजनक आहे.
ब्रिक्स देश आता डॉलरपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या शत्रूतापूर्ण देशांकडून आम्हाला असे आश्वासन हवे आहे की त्यांच्याकडून कोणतेही नवे ब्रिक्स चलन वापरले जाणार नाही किंवा अमेरिकी डॉलरऐवजी दुसऱ्या चलनाचा ते स्वीकार करणार नाहीत. अन्यथा त्यांना 100 टक्के टॅरिफचा सामना करावा लागेल. अमेरिकी अर्थव्यवस्थेत नवीन चलन विक्रीची स्वप्ने या देशांनी पाहू नयेत.
रेल्वे बजेट काय होतं? सरकारने का बंद केलं.. वाचा, निर्णयामागची खरी स्टोरी..
आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा अन्य कोणत्याही ठीकाणी ब्रिक्स अमेरिकी डॉलरची जागा घेऊ शकत नाही. जो देश असा प्रयत्न करेल त्याला टॅरिफचा सामना करावा लागेल असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही ब्रिक्स देशांना इशारा दिला होता. मागील आठवड्याच ओवल ऑफीसमध्ये स्वाक्षरी समारोहात ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. जर ब्रिक्स देश असे काही करू इच्छित असतील तर ठीक आहे. आम्ही अमेरिकेबरोबरील त्यांच्या व्यापारावर 100 टक्के टॅरिफ लावू. या वक्तव्याचा अर्थ धमकी घेऊ नये स्पष्ट भूमिकेच्या रुपात याकडे पाहिलं पाहिजे.