2.2 C
New York

Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंना भेटायची चोरी नाही, फडणवीसांनी क्लिअर बोलून दाखवलं…

Published:

धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) भेटायची चोरी नाही, कधीही भेटू शकतो, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी क्लिअर बोलून दाखवलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरण, भ्रष्टाचार, बोगस बिलांचे गंभीर आरोप होत असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातील मंत्री त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवलं आहे. मराठी साहित्य संमेलन कार्यालयाचं उद्घाटन आज पार पडलं. त्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधलायं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या कामानिमित्त आले होते, आत्ता माझी त्यांच्याशी भेट झाली नाही पण सकाळी आमची भेट झाली,कारण आम्ही कॅबिनेटमध्ये काम करतो, मुंडे हे मंत्रिमंडळातील मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटण्याची चोरी नाही, ते मला आणि मी त्यांना कधीही भेटू शकतो. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून अजितदादांची भूमिका अधिकृत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

तसेच आज मराठी साहित्य संमेलन कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं. मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे ही एक अभिमानाची गोष्ट असून त्यासाठी एक मोठी टीम काम करीत आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दिल्लीत पहिल्यांदाच दिल्लीत साहित्य संमेलन होत आहे. मराठी साहित्य संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. या साहित्य संमेलनासाठी जी काही मदत लागेल ती मदत देणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.

दिल्लीत पुढील काही दिवसांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत फिरत असताना दिल्लीच्या लोकांच्या मनात परिवर्तन दिसंत आहे. यंदा दिल्लीकर विधानसभेची चावी भाजपच्या हाती देणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलायं.

Devendra Fadnavis तर उद्धव ठाकरेंना मीही भेटलो असतो…

भाजपाचे नेते पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त उद्धव ठाकरे वधूवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी पोहचले तेव्हा भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची भेट झाली. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना लग्नात भेटले ही छान गोष्ट आहे, लग्नात भेटल्याने युती होते असं नाही. लग्नात भेटणे हे स्वाभाविक असून मी असतो तर मीही भेटलो असतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img