-0.5 C
New York

Ajit Pawar : ‘खबरदार, कुणी खंडणी मागितली तर..’, बीडमध्ये दाखल होताच अजितदादांनी ठणकावलं!

Published:

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख बीड जिल्ह्याची राज्यात चर्चा सुरू झाली. येथील ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि खंडणीच्या गुन्ह्यांचीही मोठी चर्चा झाली. या जिल्ह्याचा पालकमंत्रिपदाची जबाबदारी अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वीकारली. त्यानंतर आज अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. येथे येताच त्यांनी आपल्या स्टाईलने पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत स्वपक्षीयांचेही कान टोचले. खंडणी मागणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचाही इशारा दिला. यावेळी मंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, अफवांवर कुणीही विश्वास ठेऊ नये. काही तथ्य असेल तर नक्कीच कारवाई होईल. विकासकामे करत असताना कुणी कोणाल खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नये. जर असे काही प्रकार माझ्या कानावर आले तर मी मकोका लावायलाही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. काही अधिकारी येथे बऱ्याच वर्षांपासून आहे. त्यांनाही मी पाहणार आहे. असे करताना माझ्याकडून कोणताही भेदभाव केला जाणार नाही.

Ajit Pawar ..तर परवानाच रद्द करणार

हवेत गोळीबार करणारे, कंबरेला रिव्हॉल्हवर लावून फिरणाऱ्यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यावरही अजित पवार यांनी कडक शब्दांत सुनावलं. मी पोलीस प्रशासनाला सांगणार आहे की जो कोणी असले काही प्रकार करेल तर त्याचा रिव्हॉल्व्हरचा परवाना तत्काळ रद्द करावा. रिव्हॉल्व्हर तुमच्या संरक्षणासाठी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जे काही रिल तयार केले जात आहेत हे असले प्रकार मी आजिबात खपवून घेणार नाही, असाही इशारा अजित पवार यांनी दिला.

येथे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष वेगवेगळ्या सेलचे प्रमुख उपस्थित आहेत. बाबांनो माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे. कुठलीही कामं मंजूर झाली तर ती कामे दर्जेदार असली पाहिजेत. कुठलेही वेडेवाकडे प्रकार झाले तर ते मी आजिबात सहन करणार नाही. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जवळचा, दूरचा हे बघणार नाही. हा जनतेचा पैसा आहे अशा शब्दांत पालकमंत्री अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुनावलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img