-2.9 C
New York

Delhi Elections : महिलांना दरमहा अडीच हजार, 500 रुपयांत सिलिंडर; काँग्रेसने पाडला आश्वासनांचा पाऊस

Published:

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आता (Delhi Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आश्वासनं आणि घोषणांचा पाऊस पडू लागला आहे. यात आता काँग्रेसचीही भर पडली आहे. काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी घोषणापत्र (Congress Manifesto) जारी केले आहे. या घोषणापत्रात महिला आणि युवकांसाठी अनेक मोठ्या घोषणा पक्षाने केल्या आहेत. काँग्रेस सत्तेत आल्यास गरीब घरातील एका महिलेला दरमहा अडीच हजार रुपये देण्याचे घोषणा केली आहे.

काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात अनेक आश्वासने दिली आहेत. यामध्ये 500 रुपयांत गॅस सिलिंडर देण्याचं मोठं आश्वासन काँग्रेसने दिलं आहे. तसेच प्रत्येक महिन्याला पाच किलो तांदूळ, दोन किलो साखर, एक किलो कुकिंग ऑइल, सहा किलो डाळ, 250 ग्रॅम चहा पावडरसह एक रेशन कीट मोफत दिली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला दर महिन्याला अडीच हजार रुपये दिले जातील. कर्नाटकात या योजनेला लागू करण्यात आले आहे. आता दिल्लीत सत्तेत आल्यास येथेही लागू करू असे काँग्रेसने म्हटले आहे.

सुळेंनी भावनिक मुद्दा उपस्थित करत दाखवला मुंडेंना आरसा

दिल्लीतील नागरिकांना 25 लाखांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातील. यामध्ये मोफत औषधे आणि तपासणीही समाविष्ट असेल. राजस्थानात ही योजना लागू केली होती. आता दिल्लीतही करण्याचा मानस आहे असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. सर्व बेरोजगार युवकांना पब्लिक किंवा प्रायव्हेट क्षेत्रात एक वर्षाची अप्रेंटिसशीप दिली जाईल. या दरम्यान या युवकांना 8500 रुपये दिले जातील असे पार्टीच्या नेत्यांनी सांगितले.

या गॅरंटींचा वापर आज सगळ्याच पक्षांकडून केला जात आहे. पहिल्यांदा काँग्रेसने कर्नाटकात गॅरंटी या शब्दाचा उपयोग केला होता. काँग्रेस जे सांगतो ते करून दाखवतो असा संदेश लोकांमध्ये जावा यासाठी आम्ही या शब्दाचा वापर केला होता. ही फक्त गॅरंटी नाही तर जनतेचा हक्क आहे. आता दिल्लीसाठी काँग्रेसने पाच गॅरंटी याआधीच दिली आहे. ही गॅरंटी आम्ही पूर्ण करू असा विश्वास काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img