उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात मंगळवारी मध्यरात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास चेंगराचेंरीची घटना घडली. 10 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू या घटनेत झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र कुंभमेळ्यात घडलेली चेंगराचेंगरीत घटना ही नवीन नाही. याधीही कंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार, 1954 साली झालेल्या कुंभमेळ्यातही झाली होती. विशेष म्हणजे 1954 पासून आजपर्यंत म्हणजेच 2025 पर्यंत झालेल्या प्रत्येक कुंभमेळ्यात चेंगराचेगरीच्या घटना घडल्या आहेत. (maha kumbh 2025 mahakumbh stampede incident happens scene 1954)
खरंतर, मौनी अमावस्या, पौष पौर्णिमा, मकर संक्रांती, वसंत पंचमी, माघी पौर्णिमा आणि महाशिवरात्री निमित्त मोठ्या संख्येने लोक कुंभमेळ्यात जमतात. त्यानुसार आज (29 जानेवारी) मौनी आमवस्या असून 4 कोटींहून अधिक भाविकांनी गंगा स्नान केलं. परिणामी या स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमली होती. मात्र, कालांतराने वाढत गेलेल्या गर्दीचे रुपांतर चेंगरीचेंगरी झाले आणि अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागला.
Mahakumbh Stampede 1954 मध्ये घडली होती महाकुंभातील सर्वात मोठी दुर्घटना
महाकुंभातील चेंगराचेंगरीचा इतिहास नवीन नाही. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1954 मध्ये पहिल्यांदाच महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते.मौनी अमावस्येच्या निमित्ताने त्यावेळी 3 फेब्रुवारी 1954 रोजी चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत सुमारे 800 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे महाकुंभाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा अपघात होता.
Mahakumbh Stampede हरिद्वार कुंभमेळ्यात परिस्थिती बिकट
1986 मध्ये हरिद्वारमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये किमान 200 लोकांचा मृत्यू झाला. ही घटना तेव्हा तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह देशातील अनेक मुख्यमंत्री आणि खासदारांसह तेथे पोहोचले होते. त्यावेळी प्रशासन सामान्य लोकांना किनाऱ्यावर जाण्यापासून रोखत होते. अचानक मार्ग रोखल्याने गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाला.
Mahakumbh Stampede 2003 मध्ये नाशिकमध्ये झाला अपघात
2003 मध्ये नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात 12 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. लाखो लोक गोदावरीच्या काठावर स्नान करण्यासाठी पोहोचले. मात्र, भाविकांची गर्दी प्रचंड झाल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत शेकडो लोक गंभीर जखमी झाले होते.
Mahakumbh Stampede 2013 मध्ये प्रयागराजच्या महाकुंभात झाली होती चेंगराचेंगरी
2013 साली प्रयागराजच्या महाकुंभात चेंगराचेंगरी झाली होती. गंगेच्या काठावरही दुर्घटना घडली नाही तर, अलाहाबाद रेल्वे स्थानकावर घडली. हा अपघात 10 फेब्रुवारी 2013 रोजी घडलेला पादचारी पूल कोसळल्याने झाला होता. यामध्ये 42 जणांचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले होते.