-1.2 C
New York

Ajit Pawar : “सुरेश धसला काय वाटतं याचं देणंघणं नाही”, अजितदादांच्या आवाजात संताप

Published:

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. यात काही आरोपी अटकेत आहेत. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस आक्रमक असून त्यांनी आतापर्यंत अनेक गंभीर आरोप केले आहेत. या सर्व घडामोडींवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं. सुरेश धस यांच्यावर जरा संतापाच्या स्वरातच भाष्य केलं. विविध पक्षांतील खालचे कार्यकर्ते जर बोलू लागले तर त्याला अंतच उरणार नाही असे अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना सुरेश धस यांच्याकडून होत असलेल्या आरोपांबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, सुरेश धसला काय वाटतं याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही. मी सरकारमध्ये भाजपबरोबर आहे. मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करुनच महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं असा प्रयत्न असतो.

एकनाथ शिंदेंची यात महत्वाची भूमिका आहे. निर्णय घेताना आम्ही सर्व प्रमुख लोक एकत्रित बसून निर्णय घेत असतो. आता जर वेगवेगळ्या पक्षातील खालचे कार्यकर्ते बोलू लागले तर त्याला काहीच अंत उरणार नाही. जी काही भूमिका असेल ती अमित शाह, देवेंद्र फडणवीस, जेपी नड्डा, चंद्रशेखर बावनकुळे सांगतील असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar बीड प्रकरणात कुणालाच सोडणार नाही

विरोधकांकडून सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर द्यावं अशी इच्छा असल्याचे मुंडे म्हणाले होते, असे विचारले असता अजित पवार म्हणाले, बीडच्या घटनेबाबत चौकशी सुरू आहे. यात जे कुणी दोषी आढळतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसे प्रयत्नही सुरू आहेत. या चौकशीत आणखी काही नावं समोर आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. पण जर कुणाचा यात काहीच संबंध नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र संबंध असेल तर निश्चित सांगतो की कुणालाच पाठीशी घातलं जाणार नाही. हीच भूमिका आम्हा सगळ्यांची आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img