-2.9 C
New York

Dhananjay Munde : मी सध्या टार्गेटवर…सूत्रधार तुम्हीच सांगा; संतोष देशमुखांवरील प्रश्नावर मुंडेंचं उत्तर

Published:

महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज केंद्रिय मंत्र्यांची भेट घेतली. यावर बोलताना धनंजय मुंडे (Mahayuti) म्हणाले की, मी महाराष्ट्रातील महायुतीचा नेता म्हणून अन्न व नागरी पुरवठ्याची जबाबदारी घेतली. त्यानंतर पहिल्यांदाच मी आज केंद्रातील सर्व अन्न व नागरी पुरवठा मंत्र्‍यांना भेटलो. त्यांच्यासोबत अन्न व पुरवठ्यासंदर्भात जे विषय आहेत, अडचणी आहेत, त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होणं गरजेचं होतं.

एकंदरीतच लोकसंख्या वाढल्यानंतर तेवढ्या लाभार्थ्यांना लाभ मिळायला पाहिजे. आतापर्यंत सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळतोय. जनसंख्या वाढली तर साडेआठ कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळायला हवाय. पूर्ण माहिती त्यांना द्यावी लागत आहे. ऑनलाईनच्या समस्या आहेत. आठ-नऊ विषय होते. ज्यासंदर्भात चर्चा करून त्यावर तोडगा काढणं गरजेचं होतं. अन्न व नागरी पुरवठ्याच्या संदर्भात लाभार्थी ठरत नसून त्यांना लाभ मिळत नाहीये. ही फार मोठी समस्या आहे. एकीकडे आपण अन्न व सुरक्षेसंदर्भात तरतुदी करत आहोत, तर दुसरीकडे हे लोक लाभापासून वंचित राहता कामा नये.

सर्वर बऱ्याचदा बंद असतो. लोकसंख्या वाढली त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या देखील वाढली पाहिजे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला येत आहेत, हे मला निघताना माहित नव्हतं. ते या ठिकाणी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी येत आहेत. विषय होता तो जोशीसाहेबांना भेटून महाराष्ट्राच्या समस्या त्यांच्यापुढे मांडून कोट्यवधी लाभार्थ्यांना लाभ मिळावा, इतकीच होती.

संबंधित राजकीय विषय अगोदरच तुम्हाला कळाले असते. 21 व्या शतकात कोणती गोष्ट लपवून ठेवण्याचा विषय नाहीये. 51 दिवस झाले तरी मस्साजोग प्रकरणातील आरोप फरार आहेत. मी एकच गोष्ट बोललोय की, सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर (Santosh Deshmukh Murder) चढवा. जो कोणी असेल त्याला.. मोठ्यातल्या मोठी शिक्षा द्या, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना ते म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांना धनंजय मुंडे यांना दोषी वाटत असतील तर सांगावं, लगेच राजीनामा देवू. 51 दिवस ज्या पद्धतीनं ट्रायल सुरू आहे, त्यात मी टार्गेटवर आहे. मी महायुतीचा निष्ठावान आहे. राजकारणात टीकाही करतो, अन् सहनही करतो. या षडयंत्रामागे सुत्रधार कोण, हे तुम्हीच सांगा असं ते म्हणालेत. माझी नैतिकता माझ्या लोकांबाबत प्रामाणिक आहे. मला स्वत:ला मी नैतिकतेने दोषी असल्याचं वाटतं नाही, त्यामुळं ते वरिष्ठांनी सांगावं असं धनंजय मुंडे म्हणालेत. अजितदादा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच येतच असल्याचं मुंडे म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img