प्रयागराज येथील महाकुंभात (Mahakumbh) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi) यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, आज मौनी अमावस्या आहे. प्रयागराज येथील महाकुंभात भाविकांची मोठी गर्दी आहे. आठ ते दहा करोड भाविक प्रयागराजमध्ये आहेत. काल साडेपाच करोड भाविकांनी महाकुंभात (Mahakumbh Prayagraj) स्नान केलं होतं. मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी संगमवर गेल्याने एक दबाव निर्माण झालाय. प्रशासन तेथे उपस्थित आहे. रात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान आखाडा मार्गावर बॅरिकेड्स लावले होते. बॅरिकेड्स तोडून येण्याच्या प्रयत्नात अनेक भाविक गंभीर जखमी झालेत.
जखमी अवस्थेतील भाविकांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काहीजण गंभीर आहेत. काल सायंकाळी सहा ते सातवाजेदरम्यान मौनी अमावस्येचा मुहूर्त सुरू झालाय. याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर प्रशासन प्रयत्न करत आहे. महाकुंभातील अमृत स्नानासाठी देशभरातून भाविक प्रयागराजमध्ये पोहोचलेत. महाकुभांत भाविकांचं व्यवस्थित स्नान व्हावं म्हणून व्यवस्था (Mauni Amavasya) केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळपासून चारवेळा विचारपूस केलीय. गृहमंत्री अमित शाह, आनंदीबेन पटेल आणि जे.पी. नड्डा देखील यासंदर्भात रिपोर्ट घेत आहेत.
महाकुंभात चेंगराचेंगरी! अनेक भाविक जखमी, 14 जणांचा मृत्यू; अमृतस्नान रद्द
आम्ही सकाळपासून भाविकांना व्यवस्थित अमृतस्नान करता यावं, यासाठी बैठक घेत आहोत. वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. प्रयागराजमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु भाविकांच्या गर्दीने मोठा दबाव निर्माण होतोय. तिथं उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांसोबत माझी चर्चा झालीय. आचार्य महामंडलेश्वर, पूज्य संतांसोबत चर्चा झालीय. त्यावेळी ते म्हणाले की, पहिल्यांदा भाविक स्नान करतील. जेव्हा त्यांची गर्दी कमी होईल, तेव्हा आम्ही संगमवर स्नान करण्यासाठी जावू. यावर सर्वच आखाडे सहमत आहेत.
मौनी अमावस्येला सुमारे 10 कोटी भाविक महाकुंभात येण्याची अपेक्षा असल्याने उत्तर प्रदेश सरकारने या परिसरात आधीच सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापन व्यवस्था वाढवली होती. सरकारने एक सल्लागार जारी कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नये, असंही सांगण्यात आलंय. गेल्या 17 दिवसांत महाकुंभमेळ्यात 15 कोटींहून अधिक भाविकांनी संगम आणि घाटांवर पवित्र स्नान केले आहे. उत्तर प्रदेश सरकारनं सांगितलं की, एकट्या मंगळवारी 5 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलंय.
अफवांवर लक्ष देऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री योगी यांनी केलंय. संयमाने काम करा. हा जनतेचा कार्यक्रम आहे. प्रशासन त्यांच्या सेवेत गुंतलंय. सरकार पूर्ण ताकदीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहे. 15-20 किलोमीटरच्या परिघात तात्पुरते घाट बनवले आहेत, असं ते म्हणालेत.