मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेचा राज्यस्तरीय मेळावा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळाव्याला संबोधित करत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर ताशेरे ओढले आहेत. लोकसभेला १ खासदार निवडून आलेल्या अजित पवारांचे ४२ आमदार आले कसे ? अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
३१ लाडक्या बहिणींनी नाकारले पैसे! पडताळणी होणार असल्याने लाभासाठी नकार
जळगाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पडताळणी होणार आहे. त्याची धास्ती जिल्ह्यातील अंपात्र लाभार्थ्यांनी घेतली असून, आजपर्यंत ३१ लाडक्या बहिणींनी स्वताहून अर्ज करत लाभ नाकारला आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे जिल्ह्यात सात लाख ७३ हजार लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. यापैकी ज्या पात्र नाहीत त्यांनीही अर्ज करून लाभ घेतला आहे. राज्य शासनाने पात्र महिलांना लाभ देण्याचे संकेत दिले आहेत. पण, विधानसभा निवडणुका संपल्यामुळे राज्य शासनाने अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ३१ लाडक्या बहिणींनी लाभ नाकारला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याणच्या अधिकारी आर. आर. तडवी यांनी दिली.
पुणे मनपाने जीबीएस आजाराच्या पार्श्वूमीवर २५ हजार घरांचे सर्वेक्षण
पुण्यात सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड गाव,धायरी,किरकटवाडी तसेच आंबेगाव परिसरांत गुलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे.
त्यातील २० हजार घरांना निर्जंतूक पाण्यासाठी “मेडिक्लोर’ औषध बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सामूहिक आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या सामूहिक आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवसापासून मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर सलाईनद्वारे उपचार करण्यात आले होते. दरम्यान आज मनोज जरांगे पाटील दुपारी बारा वाजता मराठा समाज बांधवांशी आणि उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उपोषणाबाबतचा पुढील निर्णय जाहीर करणार आहे. आज दुपारी बारा वाजता मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार की दुसरा कोणता निर्णय जाहीर करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.