0.5 C
New York

Sushma Andhare : झिशान सिद्दीकींनी डायरी आधीच का काढली नाही?, सुषमा अंधारेंचा सवाल

Published:

आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddhiqui)यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंट नंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाली. राजकीय नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया देखील उमटल्या. अशातच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare )यांनी प्रतिक्रिया देत, ‘राज्य सरकार या प्रकरणात कमी पडत आहे’ अशी टीका केली आहे.

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांकडे स्टेंटमेंट दिलं. त्यात त्यांनी भाजपच्या मोहित कंबोज सह ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख केला. त्याप्रकरणी विरोधकांकडून अनेक टीका होताना दिसून येत आहे. ‘राज्य सरकार या प्रकरणात कमी पडत आहे ठरवून हत्या केली आहे. या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या आधी का सुचल्या नाहीत.मोहत कंबोज हे भाजपचे सदस्य आहेत.सिद्दिकी यांनी भाजपच्या मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवली त्यावेळी का बोलले नाहीत? ते डायरी लिहितात हे त्यांना माहिती असेलच.डायरी आधीच का काढली नाही ? महायुतीचा बेबनाव समोर येत आहे.’असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

Sanjay raut : ‘चर्चेशिवाय कोणतंही मत व्यक्त करणार नाही’, झिशान सिद्दीकींच्या जबाबावर राऊतांची प्रतिक्रिया

तर, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यावर ‘भाजप आमदार सुरेश धस मुंडेंचा राजीनामा मागतात. हे ईडी, सीबीआय पासून वाचण्यासाठी एकत्र आले आहेत का यांच्यात दिलजमाई नाही. महायुती मध्ये कुरघोड्यांचा राजकारण सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे सगळं सांभाळताना नाकी नौऊ येत आहे हे दिसत आहे. नवाब मलिक यांना फडणवीस यांनी विरोध केला, बाबा सिद्दिकी यांचा संबंध असेल दाऊद सोबत तरी काय फरक पडतो. यांना केवळ राजकारण करत आहेत’ अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img