0.5 C
New York

Siddhivinayak Temple : आता सिद्धीविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिर न्यासाचा मोठा निर्णय

Published:

मुंबईतील प्रसिद्ध असलेले आणि गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धीविनायक मंदिरासंबंधित एक मोठी माहिती समोर येत आहे. श्री सिद्धीविनायक मंदिरात आतापासून ड्रेस कोड लागू करण्यात आला असून सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. या संदर्भात श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं आहे.

मंदिरात दररोज हजारो भाविक भक्त येत असतात. त्यामुळे मंदिरात येत असताना तोकडे कपडे घालून येणाऱ्यांमुळे भाविकांच्या मनात संकोच निर्माण होतो. याबाबच्या काही भक्तांच्या तक्रारी, सूचना न्यासाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात येत आहे. सिद्धिविनायक मंदिरात येणारा भक्ताचा पेहराव शालिनता व पावित्र्य जपणारा असावा. जो पेहराव कराल तो दुसऱ्याला संकोत वाटणारा नसावा. या निर्णयाची भाविकांनी नोंद घ्यावी असं देखील सांगण्यात आले आहे.

Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्या म्हणजे काय ? यंदा मौनी अमावस्या कधी आहे ?

आपण बाप्पाचे दर्शन घेतोय. त्यामुळे मंदिरातील पावित्रता नष्ट होणार नाही, असे पेहराव असावा. एकाच प्रकारचे कपडे घालावे, असे काय बंधन नाही. जो पेहराव कराल तो समोरच्याला संकोच करेल असा नसावा, असे आमचे प्रामाणिक मत आहे. त्या प्रामाणिक मताप्रमाणे भक्त सुद्धा प्रामाणिकपणाने आमच्या निर्णयाचे स्वागत करतील.असं सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img