माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddhiqui) यांच्या हत्येनंतर आता आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddhiqui )यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddhiqui )यांनी चार पानी स्टेटमेंट पोलिसांकडे दिले. त्यात त्यांनी ज्या-ज्या बिल्डरांची नाव घेतली आहेत, त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी तपास करावा असं म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab)आणि भाजप नेते मोहित कंबोज (Mohit kamboj)यांची नाव घेतली आहेत. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी घणाघाती टीका केली आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणांमध्ये त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्याकडून जबाब नोंदवला गेला आहे, त्यामध्ये ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यासह मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी, या प्रकरणाची माझ्याकडे कोणती माहिती नाही. त्या विषयाशी माझा तसाही कोणता संबंध नाही. झिशान सिद्दीकी यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे, आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलं आहे आणि पोलिसांची काय भूमिका आहे, हे पहावे लागेल. मला माहित नाही. मला त्या प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल. तुम्ही ज्यांची नाव घेताय त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणतंही मत व्यक्त करणार नाही. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी दिली.
Baba Siddhiqui : बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव…;बाबा सिद्दीकी प्रकरणात धक्कादायक खुलासा
झिशान सिद्दीकीचं स्टेटमेंट काय आहे ?
आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंट मध्ये असं म्हटलं आहे की, मी वांद्रे पूर्व मतदारसंघातील संत ज्ञानेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या लोकांविरुद्ध सतत आवाज उठवत होतो आणि निषेध करत होतो. मी स्थानिक आमदार होतो, त्यामुळे नागरिकांचा मुद्दा मी मांडत होतो.. त्यामध्ये अनेक विकासकांकडून नागरीकांवर अन्याय केला जात असल्यामुळे नागरीक माझेकडे संपर्क साधत होते. मी त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या सोबत होतो. त्यामध्ये अनेक विकासक आहेत. माझ्या वडीलांना नियमितपणे दैनंदिन कामाविषयी डायरी लिहीण्याची सवय होती. माझे वडीलांच्या हत्येच्या दिवशी दि. १२/१०/२०२४ रोजी माझे वडीलांनी डायरीमध्ये मोहीत कंबोज यांचे नावाचा उल्लेख केलेला असून माझे वडीलांच्या फोनमध्ये व्हॉटस् अॅपद्वारे मोहीत कंबोज यांच्याशी सायंकाळी ०५.३० ते ०६.०० वा. च्या दरम्यान संपर्क झाल्याचे मला समजले. मोहीत कंबोज यांना वांद्रा पुर्व परिसरात सुरु करायच्या मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत माझे वडीलांना भेटायचे होते. मुंद्रा बिल्डर्सने झोपडपट्टीधारकांना संपर्क साधत असताना त्यांनी माझे वडीलांबाबत अपशब्द वापरल्याबाबतचे व्हिडीओ माझेकडे आले होते. तसेच माझे वडीलांचा ०२ दिवसामध्ये विधान परिषद आमदार म्हणून शपथविधी होणार होता.