0.5 C
New York

Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्या म्हणजे काय ? यंदा मौनी अमावस्या कधी आहे ?

Published:

येत्या २९ जानेवारीला भारतात सर्वत्र मौनी अमावस्या पाळली जाणार आहे. पण ही अमावस्या का पाळली जाते व या अमावास्येला नक्की काय करतात हे तुम्हाला माहिती आहे का ? चला तर जाणून घेऊया मौनी अमावस्या म्हणजे काय ?

मौनी अमावस्याचे व्रत कथा, पूजा विधी आणि महत्त्व हे पुराणांमध्ये सांगितले आहे. अशी मान्यता आहे की,हे व्रत केल्याने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने व्रताचे उद्यापन केल्यामुळे सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते.

हिंदू धर्मात सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. हिंदू धर्मात अमावस्येची तिथी ही भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते. त्यातही सर्व अमवस्यांपैकी मौनी अमावस्येला अधिक महत्व दिलं गेलं आहे. वर्षात १२ अमावस्या तिथी असतात. त्यापैकी माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणून ओळखले जाते. अध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची असलेली अमावस्या म्हणूनही मौनी अमावस्येकडे पहिलं जातं.अशी मान्यता आहे की, मौनी अमावस्येला स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसंच पूर्वजांसाठीही मौनी अमावस्या महत्त्वाची मानली जाते. यादिवशी पितरांना नैवेद्य आणि पिंडदान करण्याची देखील पद्धत आहे. मौनी अमावस्येला पितरांना पिंड दान अर्पण केल्याने तीन पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो.

मौनी अमावस्येला मूक ध्यान केल्याने शुभ फळ मिळत असल्याने या दिवशी मौन साधनाही केली जाते. मात्र ही मौन साधना करत असताना काय काळजी घ्यावी? त्याचे काय महत्व आहे, नियम काय आहे हे देखील माहीत असणं महत्वाचं आहे.या वर्षी माघ महिन्यातील अमावस्या तिथी २८ जानेवारीला संध्याकाळी ७.३५ वाजता सुरू होणार आहे. ही अमावस्या २९ जानेवारी रोजी संध्याकाळी ६:०५ वाजता संपेल. अशा स्थितीत २९ जानेवारीला मौनी अमावस्या साजरी होणार आहे. या दिवशी उपवास आणि पूजाही केली जाईल. महाकुंभाचे पहिले अमृतस्नान १४ जानेवारीला मकर संक्रांतीला झाले होते. त्यानंतर महाकुंभाचे दुसरे अमृतस्नान मौनी अमावास्येला होते

पण हि मौनी अमावस्या का पाळली जाते ? आणि या दिवशी मौन धारण केल्यास काय होते ?

मौनी अमावस्येला ऋषी-मुनी मौन पाळतात. मौनी अमावस्येला मौन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मौनी अमावस्येला केवळ बोलण्यातच नाही तर मनातही शांतता असते. मौन व्रत पाळणे किंवा साधना केल्याने तणावातून आराम मिळतो. मनाला शांती मिळते. एकाग्रता वाढते. ध्यान करणे सोपे होते. शांतता देवाशी जोडण्यास मदत करते. तसेच मौनी अमावस्येला मौन पाळल्याने मोक्ष प्राप्त होतो.

मौनी अमावास्येला काही नियम पाळले जातात . मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करून ध्यान करावे.यानंतर गप्प बसावे. दिवसभर मौन धारण करून जप आणि तपश्चर्या करावी.या तारखेच्या समाप्तीनंतरच मौन तोडले पाहिजे. मूक ध्यान केल्यानंतर रामाचे नाम घेणे सर्वोत्तम मानले जाते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img