मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. आज राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची पत्रकार परिषद पार पडली. त्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली त्याचबरोबर ६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले.
गेल्या ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. मात्र शासनाचा अधिकृत असा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात नाही. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. मात्र या वर्षापासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अॅड.आशिष शेलार यांनी मांडली, त्याला आता मुहूर्त स्वरूप आले आहे. या वर्षी हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून सलग तीन दिवस हा महोत्सव होणार आहे. नामनिर्देशने नामांकित पुरस्काराची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.
नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे
- सर्वोत्कृष्ट कथा :
१. अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव)
२. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मेन)
३. सुमित तांबे (समायरा ) - उत्कृष्ट पटकथा :
१. इरावती कर्णिक (सनी)
२. पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मेन)
३. तेजस मोडक – सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी) - उत्कृष्ट संवाद :
१. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२. मकरंद माने (सोयरिक)
३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी) - उत्कृष्ट गीते :
१. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव/गाणे – यल्गार होऊ दे)
२. अभिषेक रवणकर (अनन्या/गाणे-ढगा आड या)
३. प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा/गाणे-अलगद मन हे) - उत्कृष्ट संगीत :
१. हितेश मोडक (हर हर महादेव)
२. निहार शेंबेकर (समायरा)
३. विजय गवंडे (सोंग्या) - उत्कृष्ट पार्श्वसंगीत :
१. अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२. हनी सातमकर (आतुर)
३. सौमिल सिध्दार्थ (सनी) - उत्कृष्ट पार्श्वगायक :
१. मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत – भेटला विठ्ठल माझा)
२. पद्मनाभ गायकवाड (गुल्ह/ गीत – का रे जीव जळला)
३. अजय गोगावले (चंद्रमुखी/गीत – घे तुझ्यात सावलीत) - उत्कृष्ट पार्श्वगायिका :
१. जुईली जोगळेकर (समायारा/गीत – सुंदर ते ध्यान)
२. आर्या आंबेकर (चंद्रमुखी/गीत – बाई ग कस करमत नाही)
३. अमिता घुगरी (सोयरिक/गीत – तुला काय सांगु कैना) - उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :
१. राहूल ठोंबरे-संजीव होवाळदार (टाईमपास 3 / गीत – कोल्ड्रीक वाटते गार, वाघाची डरकाळी )
२. उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत- आई जगदंबे)
३. श्री. सुजीत कुमार (सनी/ गीत – मी नाचणार भाई) - उत्कृष्ट अभिनेता :
१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२. वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)
३. ललीत प्रभाकर (सनी) - उत्कष्ट अभिनेत्री :
१. सई ताम्हाणकर (पॉन्डीचेरी)
२. अमृता खानविलकर(चंद्रमुखी)
३. सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह) - उत्कृष्ट विनोदी अभिनेता :
१. मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)
२. संजय नार्वेकर (टाईमपास)
३. भरत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर) - सहाय्यक अभिनेता :
१. योगेश सोमण (अनन्या)
२. किशोर कदम (टेरीटरी)
३. सुबोध भावे (हर हर महादेव) - सहाय्यक अभिनेत्री:
१. स्नेहल तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२. क्षिती जोग (सनी)
३. मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी) - उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :
१. अकुंर राठी (समायरा)
२. रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव)
३. जयदीप कोडोलीकर (हया गोष्टीला नावच नाही) - उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :
१. ऋता दुर्गुळे (अनन्या)
२. सायली बांदकर (गाभ)
३. मानसी भवालकर (सोयरिक) - प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती :
१. आतुर
२. गुल्हर
३. ह्या गोष्टीला नावच नाही - प्रथम पदार्पण दिग्दर्शन :
१. 4 ब्लाइंड मेन
२. गाभ
३. अनन्या