0.5 C
New York

Guillain Barre Syndrome : जीबीएसचा प्रादुर्भाव वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात शिरकाव

Published:

गेल्या काही दिवसांपासून गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (Guillain Barre Syndrome ) रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.पुण्यात रुग्ण संख्येत वाढ होत असून ही संख्या १११ पर्यंत पोहचली आहे. या आजारामुळे सोलापूरातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. परंतु, आता कोल्हापूरात या सिड्रोमचा शिरकाव झाला आहे. सोलापूर आणि कोल्हापूरातही या आजाराचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोल्हापूरात याचे दोन रुग्ण सापडले असून दोन्ही रुग्णांवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यापैकी एक रुग्ण कर्नाटकातील कोगणोळी इथला तर दुसरा हुपरी येथील असल्याचे समजते.या आजाराचा फैलाव हळूहळू राज्यात वाढू लागला आहे त्यामुळे आरोग्य विभाग अलर्टवर आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही असे आवाहन प्रशासन आणि राज्य सरकारकडून सातत्याने केले जात आहे.मात्र, तरीही जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

जीबीएस या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातपायांना मुंग्या येणे. या आजाराचे नेमके कारण काय ते सध्या माहीत नाही. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे. पण गुइलेन बॅरे सिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतात. गुइलेन बॅरे सिंड्रोम दोन तृतीयांश रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर सात दिवस ते पाच आठवड्यानंतर दिसून आले. पण काही लोकांमध्ये हे संक्रमण ट्रिगरसारखे कार्य करते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img