राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddhiqui) बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव…;बाबा सिद्दीकी प्रकरणात धक्कादायक खुलासा यांच्या हत्येनंतर अनेक खुलासे समोर येताना दिसून आले. अशातच बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी याने पोलिसांकडे दिलेल्या एका स्टेटमेंट मध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. त्या स्टेटमेंटमध्ये झिशान सिद्दीकी (zeeshan siddhiui ) यांनी काही बिल्डर आणि आमदारांची नावे घेतली आहेत. झिशान सिद्दीकी यांनी चार पानी स्टेटमेंट पोलिसांकडे दिले. त्यात त्यांनी ज्या-ज्या बिल्डरांची नाव घेतली आहेत, त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी तपास करावा असं म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांची नाव घेतली आहेत.
बाबा सिद्दीकी हे डायरी लिहायचे. ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान व्हॉट्स अॅपवरुन त्यांचं मोहित कंबोज यांच्याशी बोलणं झालं होतं. एका बिल्डरच्या पाठपुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांना भेटायचं होतं.माझे वडिल दोन दिवसांनी विधान परिषदेवर शपथ घेणार होते. पण त्याआधीच 12 ऑक्टोबरला त्यांची गोळी मारुन हत्या झाली असं झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे. या हत्या प्रकरणात SRA अँगलने तपास व्हावा, असा झिशान सिद्दीकी यांचा प्रयत्न आहे. त्यांनी काही मोठे बिल्डर आणि विकासकांची नाव घेतली आहेत. अनिल परब हे एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते.
आपल्या वडिलांच्या हत्येनंतर ज्या पद्धतीने तपास सुरु होता त्यावरुन समाधानी नाहीत हे झिशान सिद्दीकी यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता आमदार झिशान सिद्दीकी यांनी केलेल्या खळवळजनक दाव्यावरुन आता राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.