0.5 C
New York

Anil Parab : ‘माझ्या माहितीप्रमाणे अदानीच…’, झिशान सिद्दीकींच्या आरोपानंतर अनिल परबांचं मोठं वक्तव्य

Published:

आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan siddhiqui) यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंट मध्ये अनेक गौप्यस्फोट केले. त्यात भाजपच्या मोहित कंबोजसह ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्या आरोपानंतर भाजपचे मोहित कंबोज (Mohit kamboj)यांनी व्हिडिओ मार्फत प्रतिक्रिया दिली तर आमदार अनिल परब (Anil Parab )यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत यासंदर्भात भुमिका मांडली.

आमदार अनिल परब (Anil Parab ) यांनी आज पत्रकार परिषद घेत, “मी आरोपपत्र वाचलेलं नाही. पण पोलिसांना तपासत जे आढळलं, ते पोलिसांनी लिहिलेलं असेल. त्यातूनही झिशान सिद्दीकीच समाधान झालेलं नसेल, त्याचा काही वेगळा अँगल असेल, सरकार त्यांचच आहे. त्याने सरकारकडे पुन्हा तक्रार करावी.पोलीस पुन्हा चौकशी करतील. यात सत्य अजून काही लपलेलं असेल, ते त्याला माहित असेल, कोणा-कोणाचे त्याच्या वडिलांना फोन येत होते.अशा बातम्या सतत टीव्हीवर येते होत्या. छोटा शकीलने त्याच्या वडिलांना धमकी दिली ही बातमी मी टीव्हीवर पाहिलेली. असं काय असेल ते अँगल तपासून बघितले पाहिजेत”अशी प्रतिक्रिया दिली.

Sushma Andhare : झिशान सिद्दीकींनी डायरी आधीच का काढली नाही?, सुषमा अंधारेंचा सवाल

तर, ‘सरकार, पोलीस त्यांचेच आहेत. त्यांची अजूनही काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे जावं. त्यांच्याच पोलिसांवर त्यांचा अविश्वास असेल, तर यात मी काही करु शकत नाही. यात त्याचं समाधान होत नसेल, तर त्याने पुन्हा एकदा दाद मागवी.’ असा सरकारवर देखील गंभीर आरोप केला आहे. सगळ्याची चौकशी पोलिसांनी करावी. माझ्या माहितीप्रमाणे अदानीच पण नाव आहे.जीबीआरमध्ये रेकॉर्डिंग आहे. ते रेकॉर्डिंग एसआरएला जातं.एसआरएचे अधिकारी त्याची दखल घेतात. या सगळ्याचा कुठेना कुठे उल्लेख असेलच ना. बिल्डरला आम्ही सगळेच ओळखतो. बिल्डर आम्ही आणत नाही, लोक आणतात. त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं. त्या सभेला आम्ही उपस्थित होतो. त्यात गैर काय?”असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img