आज भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन !
प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथ सज्ज
शरद पवारांची तब्येत खालावली, सर्व कार्यक्रम रद्द
पुण्यात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; 4 जण जखमी
अंतरवाली सराटीत आजपासून मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं आमरण उपोषण
स्वराज्य मिळालं पण सुराज्य बनवणं आपलं काम – छगन भुजबळ
बावनकुळेंना महसूल मंत्री पद दिलं हा सर्वात मोठा गुन्हा – संजय राऊत
भंडाऱ्यात आयुध निर्माण फॅक्टरीत भीषण स्फोट, पाच जणांचा मृत्यू
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज नाशिक दौरा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, 15 लाख 75 हजार कोटींचे करार
अपयश आले असेल तरी आम्ही नैतिकता सोडली नाही – सुप्रिया सुळे
छोटा राजनचा हस्तक डि.के रावला खंडणीच्या गुन्ह्यात अटक
भारतीय सेलिब्रिटींना पाकिस्तानातून धमकीचा मेल
राज्यात 16 लाख युवकांना मिळणार नोकऱ्या; दावोसमध्ये 54 करारांवर शिक्कामोर्तब
पुण्यातील कार्यक्रमात पवार काका – पुतण्या एकाच मंचावर येणार
बारामतीनंतर आज पुण्यातील एका सुगर इन्स्टिट्युटची वार्षिक सभेत शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसणार आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही संपन्न होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काका- पुतण्या एकत्र दिसणार आहेत.
बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळालाच पाहिजे – संजय राऊत
मीरा भाईंदर -तीन बांगलादेशी नागरिक अटकेत
मिरा भाईंदर अनैतिक मानवी शाखेनी तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.यांनी भारतात घुसखोरी केली होती.मागील अनेक वर्षापासून त्यांचं इथे वास्तव्य आहे.मिरा भाईंदर पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात आहे.त्यांच्याकडून काहीक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.मिरा भाईंदर शहरात अनेक बांगलादेशी नागरिक राहत आहेत.त्यांची कोणत्याही प्रकारची नोंद प्रशासनाकडे नाही.त्यामुळे पोलिसांकडून अधिक कारवाई होणे गरजेचे आहे.
वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मीक कराडचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी केज न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलाय. यात १८ जानेवारी रोजी सुनावणी होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळं आज कराडच्या जामीन अर्जावरील केज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे..त्यामुळं या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे..
अकोल्यात आज आक्रोश मोर्चा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात आक्रोश मोर्चा. सर्वधर्मीय व सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे जन आक्रोश मोर्चाच आयोजन. दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीसाठी निघणार मोर्चा. वैभवी संतोष देशमुख, आमदार सुरेश धस, मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील करणार मोर्चाला मार्गदर्शन आणि नेतृत्व.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. जालना शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.त्याचबरोबर माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे..
बुलढाणा जिल्ह्यातील ९३ टक्के शेतकरी रब्बी हंगामातील पीक कर्जापासून वंचित
रब्बी हंगाम संपत आला आहे, तरी केवळ ७ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे, जिल्ह्यात ६९ हजार २०० शेतकऱ्यांना ७०० कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे, मात्र अद्याप केवळ ४ हजार ७३७ शेतकऱ्यांना ६२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याने जिल्ह्यातील ९३ टक्के शेतकरी रब्बी हंगामातील पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत, शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवणाऱ्या बँकावर फौजदारी दाखल करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमोल रिंढे यांनी दिला आहे…
अजित पवार यांच्या हस्ते जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा मुख्य कार्यालयाचे उद्घाटन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा मुख्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी महिलांनी औक्षण करून केलं अजित पवारांचं स्वागत केलंय. या वेळी फित कापून जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा मुख्य कार्यालयाचे अजित पवार यांनी उद्घाटन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदुरबारच्या बाजारपेठांमध्ये लसणाचे दर पुन्हा गगनाला; एक किलोसाठी मोजावे लागणार ६०० रुपये
500 रुपये प्रति किलो मिळणारा लसूण आता 600 रुपये किलो…..
लसणाची आवक कमी असल्याने लसणाच्या दरात तेजी कायम…..
लसणाच्या दरात महिनाभरापासून सातत्याने वाढ….
लसणाचे दर दिवसान दिवस वाढत असून याचा फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे…..