19.9 C
New York

Pune Accident :  पुण्यात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; 4 जण जखमी

Published:

राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत (Pune Accident) आहे. भरधाव वेगातील वाहनांकडून हिट अँड रनचे प्रकार तर सर्रास घडत आहेत. वाहनावरील नियंत्रण सुटून होणाऱ्या अपघातांचेही प्रमाण जास्त आहे. आताही पुणे शहरात अत्यंत भीषण अपघात घडला आहे. वडगाव ब्रिजच्या जवळ झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे पाच वाजण्याच्या सु्मारास हा अपघात झाला.

बाह्यवळण मार्गावर वडगाव ब्रिजजवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोराची धडक दिली. या कारची धडक इतकी जोरात होती की कारमधील सहापैकी दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बाकीचे चार जण जखमी झाले. या जखमी तरुणांना तत्काळ नवले हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बाह्यवळण मार्गावर वडगाव ब्रिजजवळ बस थांबली होती. या बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. यामुळे हा भीषण अपघात झाला. वाढदिवसाची पार्टी करून स्विफ्ट कारमधून युवक घरी परतत होते. याचवेळी हा अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा पैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार; राऊतांचा खळबळजनक दावा

अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा सुरू केला. मयत युवकांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले. जखमी चार जणांना आधी नवले हॉस्पिटल नंतर पुढे एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. या अपघाताची माहिती अपघातग्रस्तांच्या पालकांना देण्यात आली. पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव (Road Safty) असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. परंतु त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img