4.2 C
New York

Shah Rukh Khan  : राज्य सरकार शाहरुख खानला देणार 9 कोटी; चूक नेमकी कुणाची?

Published:

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) एक याचिका दाखल केली होती. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीसाठी जास्त रक्कम अदा करण्यात आल्याची बाब या याचिकेत नमूद करण्यात आली आहे. आज शाहरुखचा याच जागेवर मन्नत बंगला उभा आहे. राज्य सरकार या याचिकेला आता दोन वर्षांनंतर मंजुरी देण्याची शक्यता आहे. शाहरुख खानला कोट्यावधी रुपये जर असे झाले तर पुढील कार्यवाही होऊन मिळू शकतात. मन्नत बंगला वांद्रे पश्चिम परिसरात आहे. या बंगल्याचे बांधकाम राज्य सरकारने मूळ मालकाला पट्ट्यावर दिलेल्या जमिनीवरकरण्यात आले आहे. व्यवहाराला मंजुरी मिळाल्यानंतर ही जमीन मूळ मालकाने शाहरुख खानला विक्री केली होती.

रजिस्टर्ड कराराच्या माध्यमातून तब्बल 2446 स्क्वेअर मीटर परिसरातील ही प्रॉपर्टी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या नावावर स्थानांतरीत करण्यात आली होती. लीजवर दिलेल्या प्रॉपर्टीला कंप्लिट ओनरशीपमध्ये रुपांतरीत करण्यास मंजुरी देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा लाभ घेण्याचा विचार दोघांनी केला. रेडी रेकनर दराच्या 25 टक्के रक्कम दोघांनी मार्च 2019 मध्ये अदा केली. ही रक्कम जवळपास 27.50 कोटी रुपये इतकी होती.

फडणवीसांना ट्रॅपमध्ये अडकवत जरांगेंची उपोषणाच्या पहिल्याच दिवशी तोफ

मीडिया रिपोर्ट्सनुसार शाहरुख खानला कन्व्हर्जन फी गणना करताना राज्य सरकारकडून काहीतरी चूक झाल्याचे लक्षात आले. कन्व्हर्जन फीसच्या गणनेच्या प्रक्रियेत जमिनीऐवजी बंगल्याच्या किंमतीचा विचार करण्यात आला होता. अधिकाऱ्यांकडून झालेली ही चूक सप्टेंबर 2022 मध्ये खान परिवाराच्या लक्षात आली. नंतर गौरी खानने एमसीडी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली.

जास्तीची रक्कम दिली गेली होती ती रक्कम परत करावी अशी मागणीही करण्यात आली. ही रक्कम जवळपास 9 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार सूत्रांनी सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारला पाठवला आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळताच जास्तीची रक्कम शाहरुख खान कुटुंबियांना परत देण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img