राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त समोर येत असून, पवारांचे नियोजित सर्व दौरे पुढील चार दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहे. काल (दि.24) कोल्हापुरातदेखील पत्रकार परिषदेत बोलताना पवारांना सारखा खोकल्याचा त्रास होता होता. त्यानंतर आता त्यांचे सर्व नियोजित दौरे चार दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे. (Sharad Pawar All Program Cancel due to health Issue)
Sharad Pawar कालही बोलताना येत होता खोकला
शरद पवार यांनी काल (दि.24) कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. तसेच अन्य एका कार्यक्रमातही सहभागी झाले होते. त्यावेळी उपस्थित करताना शरद पवारांना सारखा खोकला येत असल्याचे दिसून आले होते. यामुळे त्यांना भाषण करण्यातही व्यत्यय येत होता. तर त्याआधी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही पवारांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळीदेखील त्यांचा आवाजावरून त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे जाणवत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांना माझा घसा खराब आहे असे म्हणत थांबण्याची विनंती केली होती.
खरचं एसटीची भाडेवाढ झाली का?; अजितदादांच्या उत्तरानं गोंधळच वाढला..
Sharad Pawar स्वबळाच्या संकेतावर पवारांचं सूचक विधान
यावेळी पत्रकारांनी त्यांना उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेविषयी विचारलं असता पवार म्हणाले, दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माझ्याकडे आले होते. आमच्यात या मुद्द्यासह अन्य मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी काल त्यावर भाष्य केलं. हे त्यांचं मत आहे. मात्र त्यासाठी आता उद्धव ठाकरे फार टोकाची भूमिका घेतील असं मला वाटत नाही.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल दोन गटांचे मेळावे झाले. बीकेसीमध्ये शिंदेसेनेचा तर अंधेरीत ठाकरे गटाचा मेळावा झाला. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला तुलनेने जास्त गर्दी होती असे पवार म्हणाले. ठाकरे गटातील नेते कार्यकर्ते, पदाधिकारी जे बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत ते आता शिंदे गटात जातूील असे मला वाटत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतंत्र लढण्याच्या विचारात असतील तर त्याविषयी महाविकास आघाडीत सामंजस्याने विचार करण्यात येईल असेही शरद पवार म्हणाले.