राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या त्यांच्या गावातच ते उपोषणाला सुरुवात करतील. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसह अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. मागील 18 महिन्यांपासून जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. या काळात त्यांनी सहा वेळा उपोषण केले आहे. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी 25 जानेवारीपासून उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता.
Manoj Jarange उपोषणातील आठ मागण्या कोणत्या
१. महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहे म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे…
२. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस सरसकट सर्वांच्याच मागे घेण्यात याव्यात. सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे…
३. शिंदे समितीने राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचे काम तत्काळ सुरू करावे. शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ मिळावी.
४. महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहे म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे…
५. कुणबी नोंदी शोधण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ,कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडीटी देण्यासाठी, जिल्हा व तालुकास्तरावर कक्ष स्थापन केले होते ते कक्ष पुन्हा तात्काळ सुरू करण्यात यावे .वंशावळ समिती मोडी लिपी समिती व सर्व भाषेचे अभ्यासक यांची मोठी टीम तात्काळ नोंदी शोधण्यासाठी तयार करण्यात यावी…
६. हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर,बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर,लागू करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी…
७. महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती करणारा वर्ग आहे म्हणजेच कुणबी आहे. ओबीसी क्रमांक 83 वर कुणबी आहे. आणि 2004 सालीचा अध्यादेश आहे. म्हणजेच मराठा आणि कुणबी एकच आहे. मराठ्यांची पोटजात -उपजात कुणबी आहे.
८. मा. न्यायमूर्ती शिंदे साहेब समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करावे . मा. शिंदे समितीला एक वर्ष मुदत वाढ द्यावी….