ओतूर,प्रतिनिधी:दि.२४ जानेवारी ( रमेश तांबे )
ओतूर पोलीसांनी नाकाबंदी दरम्यान एका दुचाकी चोराला बेड्या ठोकण्यात आल्या असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.
कल्पेश दिपक साळवे ( वय १८ वर्षे,रा.कोतुळ, ता.अकोले,जि.अहमदनगर ) असे दुचाकी चोराचे नाव आहे.याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एल जी थाटे अधिक माहिती देताना म्हणाले की,
बुधवारी दि.२२ रोजी ओतूर ते ब्राम्हणवाडा रोडवर आंबेगव्हाण फाटा येथे पोलीस कर्मचारी शामसुंदर जायभाये, ट्राफिक वॉर्डन शुभम काशिद, गोरक्षनाथ गवारी हे नाकाबंदी करीत असताना, एका संशयीत व्यक्तीस दुचाकी थांबवून त्याच्याकडे चौकशी करीत असताना त्याच्याकडील दुचाकी ही पॅशन प्रो कंपनीची नं. एम एच १७ एडब्लु ७३७८ या नंबर ची होती. गाडी नंबरची खात्री केली असता तो याम्हा गाडीचा नंबर असल्याचे दिसून आले. तेव्हा गाडीचे चेसी नंबर वरून ओरीजनल नंबरची माहिती घेतली असता त्या गाडीचा ओरीजनल नंबर एम. एच.१४ बी.ई.६३२५ असुन ती गाडी हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची असल्याचे समजले.याबाबत त्या व्यक्तीकडे चौकशी करण्याकरिता त्याला पोलीस स्टेशनला घेवून येवून चौकशी केली या मोटरसायकल चोरी बाबत ओतूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याचे समजले.या इसमाचे नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव कल्पेश दिपक साळवे असे असून या गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यामुळे दाखल गुन्ह्याच्या तपासी अधिकारी पो.हवा.भारती भवारी यांनी अटक केली गुरुवारी (दि.२३) रोजी जुन्नर न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस हवालदार भारती भवारी करीत आहेत.