राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांत अस्वस्थता वाढली आहे. अविश्वासाचं वातावरण तयार झालं आहे. नेते मंडळी पक्ष सोडून चालली आहेत. ठाकरे गटाला सर्वाधिक गळती लागली आहे. यातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाकरे गटच नाही तर काँग्रेसलाही खिंडार पाडण्यात येणार असल्याचा दावा केला होता. दुसरीकडे ठाकरे गटातून संमिश्र प्रतिक्रिया आल्याने गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं. यानंतर या सगळ्या घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) भाष्य केलं आहे. ठाकरे गट फुटेल असं मला वाटत नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवार यांनी आज सकाळी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. पवार म्हणाले, उद्योगमंत्री सामंत दावोसला गुंतवणुकीसाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी गेले होते अशी जोरदार कोपरखळी पवारांनी मारली.
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, विक्रमी 15 लाख 75 हजार कोटींचे करार
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल दोन गटांचे मेळावे झाले. बीकेसीमध्ये शिंदेसेनेचा तर अंधेरीत ठाकरे गटाचा मेळावा झाला. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला तुलनेने जास्त गर्दी होती असे पवार म्हणाले. ठाकरे गटातील नेते कार्यकर्ते, पदाधिकारी जे बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत ते आता शिंदे गटात जातूील असे मला वाटत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतंत्र लढण्याच्या विचारात असतील तर त्याविषयी महाविकास आघाडीत सामंजस्याने विचार करण्यात येईल असे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar काय म्हणाले होते उदय सामंत ?
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे. त्यामुळे ठाकरे गट पुन्हा फुटणार आहे. त्यांचे चार आमदार आणि तीन खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत सहभागी होतील. रत्नागिरीत त्याचा ट्रेलर दाखविणार आहोत असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.