आपलं स्वतः च हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. (Joint Home Loan) यासाठी पैशांची बचत करून घर खरेदी करण्याचा अनेकांचा विचार असतो. तरीही एकाच वेळी रक्कम देऊन घर खरेदी करणे अनेकांना शक्य होत नाही. अशा वेळी घर खरेदी करण्यासाठी कर्जाचा पर्याय राहतो. गृह कर्ज हा (Home Loan) सर्वात सोपा पर्यायही मानला जातो. होम लोन घेताना तुम्ही जॉइंट होम लोन घेण्याचा (Joint Home Loan) विचार करू शकता. सामान्य कर्जाच्या तुलनेत हे कर्ज मिळणे अधिक सोपे आहे. यामध्ये कर्जाची रक्कम जास्तही असू शकते. जर पती आणि पत्नी दोन्ही प्रोफेशनल असतील तर जॉइंट होम लोन हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
Joint Home Loan जॉइंट होम लोन कुणासोबत घेऊ शकता
जॉइंट होम लोन कुणासोबतही घेऊ शकता. तरीही महिला जॉइंट अर्जदार असेल तर जास्त फायदा होतो. पती आणि पत्नी दोघे मिळून जॉइंट होम लोन घेऊ शकतात. जर पुरुष अविवाहित असेल तर अशावेळी माता पित्यांनाही अर्जदार बनवू शकतो.
Joint Home Loan जॉइंट लोनवर कर सवलत
जर तुम्ही पत्नीसह जॉइंट लोनसाठी अर्ज केला तर दोघेही कलम 80 सी अंतर्गत आयकर सवलतीसाठी क्लेम करू शकतात. लोन प्रीपेमेंट केल्यानंतर व्याजात 2 लाखांची वेगवेगळी कर सवलत मिळेल. प्रिंसिपल रकमेवर एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये कर सवलत घेतली जाऊ शकते.
Joint Home Loan कमी व्याजदरात मिळेल कर्ज
काही बँका आणि NBFC महिला खरेदीदार असेल तर कमी दरात कर्ज उपलब्ध करून देतात. या कर्जाचा व्याजदर अर्ध्या टक्क्यांपर्यंत कमी असू शकतो. महिलेच्या नावे कर्ज असेल तर स्टँप ड्युटी आणि नोंदणी फी मध्ये सुद्धा काही सवलत मिळते. पण हे सर्व लाभ तेव्हाच मिळतील जेव्हा महिला संबंधित प्रॉपर्टीची को ओनर असेल.
Joint Home Loan पहिल्या घरावर अतिरिक्त सवलत
पहिल्यांदा घर खरेदी करत असाल होम लोनच्या व्याजावर 50 हजार रुपये (Home Loan Interest) अतिरिक्त कपात मिळते. परंतु यासाठी कर्जाची रक्कम 35 लाख आणि प्रॉपर्टीची किंमत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. व्याज दिल्यानंतर दीड लाख रुपयांची अतिरिक्त सूट मिळवण्यासाठी स्टँप ड्यूटीची व्हॅल्यू 45 लाख रुपये किंवा यापेक्षा कमी असावी.
Joint Home Loan क्रेडिट स्कोअरमध्ये होईल सुधारणा
जॉइंट होम लोन घेतल्यानंतर अर्जदारांचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) देखील सुधारतो. कारण होम लोन सर्वाधिक सुरक्षित कर्ज मानले जाते. जर तुमचा जोडीदार प्रोफेशनल असेल तर त्याच्या बरोबर होम लोन घेतल्याने कर्जाच्या हप्त्याचा भारही कुणा एकावर पडणार नाही.