भंडाऱ्याच्या (Bhandara) जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झाला. त्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी११ वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला. (Explosion ) दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसले. आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाने नागरीक भेदरून गेले. या स्फोटाचे कारण काय आहे हे समोर आलेले नाही.
Bhandara ४ किलोमीटरपर्यंत आवाज
या स्फोटाची भीषणता मोठी होती. त्याचा आवाज जवळपास ३-४ किलोमीटरपर्यंत गेला. नागरीक भयभीत होऊन रस्त्यावर थांबले, तर काही जण घराबाहेर धावले. भंडारा शहराजवळील जवाहरनगर परिसरात सरकारचा आयुध निर्माण कारखाना आहे. तर, स्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
Bhandara भंडाऱ्यात भीषण स्फोटाची घटना
या फोटो आणि व्हिडीओवरून स्पष्ट होतेय की, हा स्फोट किती जास्त भीषण आहे. स्फोटानंतर आग आणि पूर्ण धूर हवेत दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीमध्ये हा स्फोट झालाय, ती इमारत पूर्णपणे उद्धवस्थ झालीये. सध्या दारुगोळा निर्मिती कारखान्यातचे मोठे अधिकारी, पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले आहेत. मदतकार्य देखील सुरू केल्याची माहिती आहे.