सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचा वाल्मिक कराडवर (Valmik Karad) आरोप होतोय. कराडने पुण्यातील सीआयडी (CID) कार्यालयात 31 डिसेंबर रोजी आत्मसमर्पण केलं होतं. पण, आत्मसमर्पण करण्यापूर्वी कराड आणि त्याचे साथीदार कुठं पळाले होते, याचं सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे.
खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी सीआयडीला शरण येण्यापूर्वी पुण्याला पळ काढला होता. ते बीडवरून पुण्याला गेल्याची माहिती आहे. याविषयीचे पुष्टी देणाऱ्या तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आला आलं आहे. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्यांमधून हत्या प्रकरणातील आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे.
Valmik Karad हॉटेलवर जेवण केलं, मग गाडीत भरले डिझेल…
हत्या प्रकरणातील आरोपींनी बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले, तसेच एका पेट्रोल पंपावर त्यांनी आपल्या गाडीत डिझेल भरलं. याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1.36 वाजता पास झाल्या. या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेला अशी चर्चा आहे. तसेच याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पाषाण येथे सीआयडीच्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून वाल्मीक कराड आला, ती गाडी याच ताफ्यातील होती अशीही माहिती आहे.
Valmik Karad कराड 6 महिने तुरुंगातून बाहेर येणार नाही…
दरम्यान, खंडणी आणि हत्या प्रकरणी न्यायालयाने कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कराडच्या समर्थकांनी कितीही मोठी वकिलांची फौज उभी केली तरी कराडला पुढचे काही महिने तुरुंगात काढावे लागणार आहेत. कारण वाल्मिक कराडवर मकोका गुन्ह्याची नोंद झाली आहे. मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपीला जामीन मिळत नाही. त्यामुळे कराड पुढील १८० दिवस म्हणजेच ६ महिने तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही अशी माहिती समोर येत आहे.