-10.7 C
New York

Pune : चरणसिंग राजपूत यांचा मद्य विक्रेता असोसिएशनच्या वतीने सत्कार 

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.२२ जानेवारी  ( रमेश तांबे )

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी सन २०२३-२४ मध्ये पुणे जिल्ह्यात हातभट्टी निर्मूलन उत्कृष्ट पद्धतीने राबविली.हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया करण्यात आल्या. हातभट्टी, बेकादेशीर गोवा दिव दमन मद्याची तस्करीच्या विरोधात विशेष मोहीम राबवली,बनावट ताडी इत्यादी बेकायदेशीर व्यवसाय करणारे व्यक्तींवर प्रस्ताव दाखल करून, दंडात्मक कारवाई करण्यात आली.एम पी डी ए ऍक्ट खाली गुन्हेगारांना तडीपारीचे आदेश यशस्वीरित्यापारित करण्यात आले.पुणे जिल्ह्यात हातभट्टीचे अड्डे कायमस्वरूपी बंद केल्याने राज्य शासनाच्या महसूल वाढीमध्ये झाला.श्री राजपुत यांनी गोवा दिव दमन बनावटीचे मद्याची तस्करी करणारे मद्य तस्कर यांचे विरोधात विशेष मोहीम राबवली.


सदर कारवयांमध्ये १ हजार पेक्षा जास्त वाहने जप्त करण्यात आली.
याबद्दल पुणे जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल,त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना “विशेष मोहीम “पदक जाहीर केले आहे. बेकायदेशीर मद्य व हातभट्टीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राजपूत यांनी पुणे जिल्ह्यामध्ये राबवलेला “राजपूत पॅटर्न” संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात यावा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मद्य विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष विनायक तांबे यांनी केले.

अधीक्षक राजपूत यांना महाराष्ट्र राज्य मद्य विक्रेता असोसिएशन यां यांच्या वतीने विशेष सत्कार ‘सन्मानचिन्ह’ गणेश मूर्ती शाल श्रीफळ देऊन पुणे येथे करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असोसिएशन मार्गदर्शक आर.टी स्वामी हे होते. सदर कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्ह्याचे उपअधीक्षक संतोष जगदाळे , सुजित पाटील, उत्तमराव शिंदे,गणेशराव कसरे हे अधिकारी उपस्थित होते.असोसिएशनच्या वतीने टी आर स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सदर प्रसंगी रामलिंग गुगरी,महिला अध्यक्ष सुनीताराजे घाडगे,कैलास गौड ,मुकेश अगरवाल, राजेंद्र थोरात, व्यंकटेश तेलंग, जयस्वाल इत्यादी महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.उत्पादन शुल्क विभागामार्फत प्रथमच उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाच्या वतीने विशेष पुरस्कार देण्याची प्रथा चालू करण्यात आली आणि त्याचा मान चरणसिंह रजपूत यांना मिळाला.

अधीक्षक श्री राजपूत यांनी सन २०२३-२४ मध्ये पुणे जिल्ह्यात हातभट्टी निर्मूलन उत्कृष्ट पद्धतीने राबविल्यामुळे हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया करण्यात आल्या. हातभट्टी, बेकादेशीर गोवा मद्य,बनावट ताडी इत्यादी बेकायदेशीर व्यवसाय करणारे व्यक्तींवर कलम ९३ अन्वये ११०० पेक्षा जास्त प्रस्ताव दाखल करण्यात आले व मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच सदरचे गुन्हे वारंवार करणाऱ्या गुन्हेगारांना  एम पी डी ए ऍक्ट खाली मोठ्या प्रमाणात तडीपारीचे आदेश यशस्वीरित्यापारित करण्यात आले.  पुणे जिल्ह्यात २८५ ठिकाणी हातभट्टीचे मोठे अड्डे कार्यात होते त्यापैकी २२३ अड्डे कायमस्वरूपी बंद करण्यात रजपूत यांना यश आले.त्याचा खूप मोठा परिणाम राज्य शासनाच्या महसूल वाढीमध्ये झाला .देशी दारूची  विक्री मध्ये प्रति वर्षे ४५ लाख लिटरने वाढ झाली. ही वाढ गतवर्षीपेक्षा १२ टक्क्याने जास्त आहे तशीच मोहीम त्यांनी गोवा दिव दमन बनावटीचे मध्याची तस्करी करणारे मध् तस्कर यांचे विरोधात विशेष मोहीम राबवली. सदर मोहिमेचा यशस्वी परिणाम होऊन पुणे जिल्ह्याचा महसूल २०२२-२३ या वर्षात १८५५ कोटी होता, त्यामध्ये  प्रचंड वाढ होऊन तो २७३०  कोटी इतका करण्यात यशस्वी.१२ हजार बेकायदेशीर मद्य तस्करी व हातभट्टी व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कारवयांमध्ये १ हजार पेक्षा जास्त वाहने जप्त करण्यात आली.
सदर कार्याची दखल महाराष्ट्र राज्य मद्य विक्रेता असोसिएशन यांनी घेऊन त्यांचा विशेष सत्कार ‘सन्मानचिन्ह’ गणेश मूर्ती शाल श्रीफळ देऊन पुणे येथे करण्यात आला. बेकायदेशीर मद्य व हातभट्टीमुक्त  महाराष्ट्र करण्यासाठी रजपूत यांनी पुणे जिल्ह्यामध्ये राबवलेला “
बालाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले व पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img