-11.1 C
New York

Google : गुगलचं गणित पक्कं! खास टेक्निकने तयार होतो मॅप; AI चा सपोर्ट मिळतो का?

Published:

कोणत्याही नव्या ठिकाणी जायचं असो किंवा एखाद्या दुकानाचा पत्ता हवा असो.. रस्त्यावर फिरण्यापासून ते थेट तुमच्या इच्छित स्थळी पोहोचणं असो.. या सगळ्याचं एकच उत्तर आहे गुगल मॅप (Google) . स्मार्टफोन काढा, मॅप चालू करा अन् तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचा. इतकं सोप्पं आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की याच गुगल मॅपला नेमकं कसं तयार केलं जातं? या मॅपला इतके सगळे रस्ते कसे माहिती असतात? गुगल मॅप खरंच एआयच्या मदतीनं ऑपरेट केलं जातं का? चला तर मग याच प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू या…

सर्वात महत्वाचं म्हणजे गुगल मॅप तयार करण्यासाठी गुगल सॅटेलाइट इमेजरी, ट्राफिक सिग्नल, फोनमधील जीपीएस आणि अन्य अनेक स्त्रोतांच्या मदतीने माहिती गोळा करते. यानंतर या माहितीला रियल टाइम डेटा एनालाइज टूल्समध्ये टाकलं जातं. या टूलच्या मदतीने या डेटाला योग्य माहितीत रुपांतरीत केले जाते. गुगल मॅप तयार करण्यासाठी वापरात येणारी माहिती सॅटेलाइट इमेजरी, ट्राफिक सिग्नलवर असणारे कॅमेरे आणि स्मार्टफोनमधील जीपीएसद्वारे मिळते.

गुगलच्या एका ब्लॉग पोस्टनुसार गुगल मॅप 250 मिलियनपेक्षा जास्त ठिकाणे आणि 300 मिलियनपेक्षा जास्त लोकल गाइड्सची मदत करण्यासाठी मोठ्या लँग्वेज मॉडेलचा वापर करते. जेणेकरून युजर्सने सर्च केल्यानंतर त्याला बेस्ट रिजल्ट देता येईल. आता गुगल लवकरच गुगल मॅप्समध्ये फोटो, रिव्यू आणि रेटिंगचाही वापर सुरू करणार आहे.

Google गुगल मॅप्स आणि गुगल अर्थमध्ये एआय

गुगल मॅप्स आणि गुगल अर्थमध्ये एआय फीचर्सचा नुकताच समावेश करण्यात आला आहे. यामुळे डेव्हलपरला खरी आणि रियल टाइम माहिती अपडेट करण्यात मदत मिळते. ऑक्टोबरमध्ये गुगलने जनरेटिव्ह AI चॅटबॉट Gemini सह मॅप जोडणी केली. Gemini डिटेल्ड स्पेसिफिकेशन सेट पूर्ण करणाऱ्या ठिकाणांना शोधण्यात मदत करील. हजारो रिव्यू एकाच ठिकाणी दाखवता येतील. वाहनाचा चालक खराब रस्ते किंवा पूर येणारी ठिकाणांचा रियल टाइम रिपोर्ट देऊ शकतो. तसेच रस्त्यात असताना इमर्सिव व्ह्यू वर हवामानाचे अपडेटही दाखवू शकतो.

एकूणच या टेक्नोसॅव्ही माहितीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की गुगल मॅप नेमकं कसं काम करतो. मॅप तयार करण्यासाठी कोणत्या घटकांचा वापर केला जातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्यात एआय तंत्रज्ञानाचा कितपत वापर केला जातो. गुगल मॅप असो किंवा कंपनीचं आणखी कोणतही टूल यात नवनवीन फीचर जोडण्याचं काम कंपनीकडून सातत्याने केलं जातं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img