मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी.सलग तीन दिवस माहिम ते वांद्रे दरम्यान ‘जम्बो मेगोब्लॉक’ असणार आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. २४, २५ आणि २६ जानेवारी रोजी जम्बो मेगा ब्लॉक ठेवण्यात आला असून ३३० पेक्षा अधिक लोकल या रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी माहिती घेऊनच प्रवास करावा.
पश्चिम रेल्वे मार्गावरील माहिम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्रीपासून १२७ उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार असून शनिवारी आणि रविवारी रात्री सुमारे १५० उपनगरीय लोकल सेवा रद्द करण्यात येणार असल्याचं समजतं आहे.
जम्बो मेगाब्लॉक कसा असणार ?
शुक्रवार, २४- शनिवार, २५ जानेवारीला रात्रकालीन ब्लॉकमुळे होणारा परिणाम
– मार्ग – अप-डाउन धीमा आणि अप-डाउन जलद
– वेळ – शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० आणि शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ते शनिवार पहाटे ६.३०
– परिणाम रात्री ११.५८ चर्चगेट-विरार लोकल ही शेवटची धीमी लोकल असणार आहे.
शनिवार, २५ आणि रविवार, २६ जानेवारीच्या मध्यरात्रीतील ब्लॉकमुळे होणारा परिणाम
– मार्ग अप-डाउन धीमा आणि अप-डाउन जलद
– वेळ – शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० आणि शुक्रवारी मध्यरात्री ११ ते शनिवार पहाटे ७.३०
– परिणाम शनिवारी रात्री १०.०७ विरार-चर्चगेट ही शेवटची जलद लोकल असणार आहे. शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर आणि बोरिवली येथून धावणाऱ्या धीम्या आणि जलद दोन्ही गाड्या अंधेरीपर्यंत धावतील. गोरेगाव आणि वांद्रेदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.
२५-२६ जानेवारी शेवटची लोकल
– रात्री ११.०७ विरार-चर्चगेट (जलद)
– रात्री १०.२२ बोरिवली-चर्चगेट (धीमी)
– रात्री १०.३३ चर्चगेट-बोरिवली (जलद)
– रात्री १०.२६ चर्चगेट-भाईंदर (धीमी)
रद्द मेल-एक्स्प्रेस २५-२६ जानेवारी
– गाडी क्रमांक १२२६७/८ मुंबई सेंट्रल-हापा-मुंबई सेंट्रल दुरांतो
– गाडी क्रमांक १२२२७/८ मुंबई सेंट्रल-इंदूर-मुंबई सेंट्रल दुरांतो