“ही चिंताजनक बाब समोर आली आहे ते दुर्दैवी आहे. बदलापूर मधील अक्षय शिंदे आणि परभणीची घटना ही गांभीर्याने घेण्यासारखी आहे. सोमनाथच नक्की काय झालं याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. परभणी आणि बीडच्या घटना वेदना देणाऱ्या आहेत. दोन्ही कुटुंबाला न्याय द्या हीच सरकारकडून अपेक्षा आहे.” असं विधान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं आहे.
आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे संघटनेची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.त्यावेळी, ‘शेतकऱ्यांच्या बाबतीतले ३ ४ निवडणुकीच्या आधीचे निर्णय आणि आत्ताचे निर्णय याची नोंद गांभीर्याने घेतली पाहिजे.हार्वेस्टरच्या बाबतीत जे आरोप झाले त्यावर उत्तर सरकारने दिले नाही.सरसकट कर्जमाफी करून सातबारा करू असा शब्द सरकारने दिला होता.शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न देशभरात आहेत.महाराष्ट्र आणि देशावरचे कर्ज वाढत जात आहे.राज्यात आणि देशात अनेक आव्हान आहेत.सरकारकडे एवढं मोठं बहुमत असूनही अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत.”असं ही त्या म्हणाल्या.
दरम्यान, “मी पॉलिसी मेकर आहे. लोकप्रतिनिधींना पडेल ते काम करावं लागतं.दोन महिन्यापूर्वी हे सरकार आलं.हे सरकार मूळ मुद्दे भरकटत आहेत.सरकार आल्यापासून मंत्रीपद ,पालकमंत्री या सगळ्यांचा कंटाळा आला आहे. विषय घेऊन कामाला लागा. राज्यसमोर अनेक आव्हाने कामाला लागा. हे सरकार असंविधानिक पोस्ट तयार करत आहे. कसली नाराजी एवढं मोठं मताधिक्य आहे. ज्या पोस्ट संविधानात नाही अशा पोस्ट देण्यामध्ये आपले राज्य एक नंबरला आहे.” अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी राज्यसरकारवर ताशेरे ओढले आहेत.