-7.4 C
New York

Saif Ali Khan : अखेर ‘सैफ अली खान’ला डिस्चार्ज !

Published:

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याला १६ जानेवारी रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी एका येऊन चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या हल्ल्यात सैफवर 6 वार झाले, त्यानंतर तो चोर पळून गेला. जखमी झालेल्या रक्तबंबाळ सैफला तातडीने लीलावतीमध्ये दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.सैफवर दोन शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. दरम्यान,पाच दिवसांनंतर अभिनेता सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सैफला मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या हल्ल्यात सैफच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर दोन गंभीर शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या. आता सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, पाच दिवसांच्या उपचारांनंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सैफला लीलावती रुग्णालयातून सोडण्यापूर्वी, पत्नी करीना कपूर खान आणि मुलगी सारा अली खान रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.

दरम्यान, सध्या त्याला शूटिंगसाठी परवानगी नसल्याची माहिती आहे.तर कोणतीही जड वस्तू न उचलण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या आहेत.सैफची प्रकृती आता ठीक असली तरी त्याला बेड रेस्टचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या प्रकरणानंतर अभिनेता सैफ अली खान याच्या सोसयटीच्या बाल्कनीत जाळ्या लावण्याचं काम देखील सुरु असल्याची माहिती आहे. अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे सुरक्षेसाठी बाल्कनीत जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img