-11.6 C
New York

Pune : खोटा सातबारा बनवून शेतकऱ्याची फसवणूक; दोन आरोपींना कोठडी

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.२१ जानेवारी ( रमेश तांबे )

ओतूर येथील बिगरशेती जमिनीचा बनावट पोटखराबा तयार करून,बनावट सात बारा व बनावट खरेदीखत तयार करून,फसवणुक करून, जमीनीच्या मुळ मालकालाच जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागीतली व बेकायदेशीर जमाव जमवून धाकदडपशाही करून, अतीक्रमण केल्या प्रकरणी संबंधित आरोपींवर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ओंकार अशोक डुंबरे,वय ३० वर्ष, रा. ओतूर ( कॉलेज समोर ),ता.जुन्नर,जि.पुणे यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून,आरोपी कैलास देवराम हांडे,रा.उंब्रज नं २, ता. जुन्नर, जि.पुणे, शंकर गणपत पोळ, रा. ओतूर ( डुंबरेमळा ), ता. जुन्नर, जि. पुणे,शंकर सावळेराम दांगट, रा. उंब्रज नं.२, ता.जुन्नर, जि.पुणे यांच्यासह संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांच्याविरोधात ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आसून,

आरोपींना दि.१८ रोजी जुन्नर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना २ दिवस पोलीस कस्टडी सुनावली असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना श्री थाटे म्हणाले की,जुन्नर तालुक्यातील ओतूर कॉलेज येथील ओंकार डुंबरे यांचे वडिल यांची आजी सिताबाई डुंबरे यांनी कोंडीबा धोंडीबा डुंबरे व केरू थोंडीबा डुंबरे यांच्याकडून सन १९६३ मध्ये १०२ गुंठे जमीन खरेदी केली होती. सन १९७१ मध्ये शरद सावळेराम दांगट यांना आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर 

( ता,जुन्नर ) कॉलेजच्या शिक्षकांच्या वसाहतीसाठी २० गुंठे बिगरशेती जागेची आवश्यकता असल्याने सिताबाई डुंबरे यांच्याकडून २० गुंठे जमीन घ्यायचे त्यांचे आपसांत ठरले. परंतू शासकीय नियमाननुसार बागायती जमीनीची बिगरशेती जमीन करण्यासाठी ४० गुंठे जमीन आवश्यक असल्याने शंकर दांगट यांना ४० गुंठे जमीन खरेदी खताने द्यायची, व नंतर त्यातील २० गुंठे जमीन परत घ्यायची, असे त्यांच्यात ठरले. तसे ठरल्याप्रमाणे सन १९७१ मध्ये सिताबाई डुंबरे यांनी ४० गुंठे जमीन शंकर दांगट यांना खरेदीखताने नाममात्र शुल्काने विकली. आणि शंकर दांगट यांनी सदर ४० गुंठे जमीन शासनाकडून बिगरशेती करून घेतली व त्यांना आवश्यक असलेली २० गुंठे बिगरशेती जमीन त्यांच्याकडे ठेवून सन १९७८ साली त्या ४० गुंठे जमीनींपैकी २० गुंठे बिगरशेती जमीन ठरल्याप्रमाणे सिताबाई डुंबरे यांना खरेदीखत विक्रीव्दारे परत दिली. सदर ४० गुंठे बिगरशेती जमीनीत कोणत्याही प्रकारचे पोटखराबा क्षेत्र नव्हते. परंतू कालांतराने त्याठिकाणी २० गुंठे पोखराबा क्षेत्र असल्याचा बनावट सातबारा आरोपी शंकर दांगट,कैलास हांडे, शंकर पोळ यांनी संबधित तलाठी व मंडल अधिकारी यांच्यासोबत संगनमत करून तयार केला. सदर २० गुंठे पोटखराबा क्षेत्रास सिताबाई डुंबरे यांच्या २० गुंठे बिगरशेती क्षेत्राच्या दक्षिणोत्तर सीमा दाखवून २० गुंठे पोटखराबा अस्तीत्वात आणला.त्याव्दारे शंकर दांगट यांच्या नावावर असलेले २० गुंठे बिगरशेती क्षेत्र व बनावट २० गुंठे पोटखराबा क्षेत्र असे एकूण ४० गुंठे क्षेत्र कैलास हांडे व शंकर पोळ यांनी खरेदी केले.कैलास हांडे व शंकर पोळ यांनी सिताबाई डुंबरे यांच्या २० गुंठे बिगरशेती क्षेत्रामध्ये सन १९७२ पासून असलेली विहीर, पाण्याची टाकी व मागील १५ वर्षापासून असलेली कांद्याची चाळ संबधित तलाठी व मंडल अधिकारी यांनी संगनमताने,सदर बनावट २० गुंठे पोटखराबा क्षेत्राच्या सातबाऱ्यावर नोंदवून घेतले व त्याचाच आधार घेवून विज वितरण कंपनीकडे सदर विहीरीवर वीज कनेक्शन घेण्यासाठी अर्ज केला. सन २०२२ मध्ये कैलास हांडे व शंकर पोळ यांनी त्यांचे सोबत आठ ते दहा इसम यांच्यासह सिताबाई डुंबरे यांचे २० गुंठे बिगरशेती क्षेत्रामध्ये अनाधिकृतपणे येवून सिताबाई डुंबरे यांचे वारस अशोक बापु डुंबरे यांना “विहीर आमची आहे, तुम्ही मध्ये येवू नका, अशी दमदाटी करून, विहीरीमध्ये बळजबरीने पाण्याची मोटार टाकून ” आमच्या नादाला लागू नका, अन्यथा आम्ही तुम्हाला जिवे मारून टाकु” अशी दमदाटी करून,सदर क्षेत्रामध्ये असलेल्या विहीरीमध्ये बळजबरीने पाण्याची मोटार टाकली. तसेच सदर विहीरीवर सन १९७३ पासून आजतागायत पर्यंत असलेले वीज कनेक्शन तोडण्यासाठी कैलास हांडे व शंकर पोळ यांनी विज मंडळाकडे अर्ज केला. सदर बनावट २० गुंठे पोटखराबा क्षेत्राचे ७/१२ बाबत तसेच विहीरी मध्ये बळजबरीने टाकलेल्या पाण्याचे मोटार काढण्याबाबत फिर्यादी यांचे नातेवाईक यांनी कैलास हांडे व शंकर पोळ यांना सांगितले असता “आम्ही केलेल्या खोट्या खरेदीखताचा खर्च तुम्ही आम्हाला आठ लाख रूपये द्या व विहीरीतील मोटार काढण्यासाठी दोन लाख रूपये द्या’ असे म्हणुन “आम्हाला खर्च दिल्यास आम्ही पोटखराबा क्षेत्राची खरेदी रद्द करू, मात्र तुम्ही पैशांची मागणीही पुर्ण करत नाहीत, म्हणुन आम्ही आमची कागदपत्र बनवत चाललो आहे, तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही तुम्हाला संपवणारच” अशी धमकी देवून रक्कमेची मागणी केली आहे. वगैरे बाबत सदरचा गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्याच्या अनुशंगाने आरोपी शंकर सावळेराम दांगट, रा. उंब्रज नं.२, ता.जुन्नर, जि. पुणे यांचेकडे तपास केला असता त्यांनी सांगितले की, कैलास हांडे व शंकर पोळ यांना २० गुंठे बिगरशेती क्षेत्र विकले असून, त्या दोघांनी सदरचा उतारा काढुन आणला व सदर खरेदीखताचे कागदपत्र तयार करून सब रजीष्टर यांचे पुढे खरेदीखतावर मी सही केली आहे. त्यानंतर कैलास देवराम हांडे व शंकर गणपत पोळ यांनी सदर जमीनीबाबत कधीही ताब्यासाठी किंवा सिमा दाखविण्यासाठी तसेच इतर हक्कांचे अधिकारासाठी म्हणजेच विहीर, कांदाचाळ, पाण्याची टाकी व पडकी इमारत इत्यादी बाबत माझेकडे कधीही विचारणा केली नसल्याची हकिगत सांगितली आहे. यावरून असे निदर्शनास आले की, कैलास हांडे व शंकर पोळ यांना सदरचे पोटखराबा क्षेत्र बोगस आहे हे माहीती असल्याने त्यांनी कधीही शंकर दांगट यांना त्या क्षेत्राबद्दल विचारणा केली नाही. खरेदी घेतानाही त्यांना त्या क्षेत्राबद्दल माहीती दिली नाही. म्हणुन आरोपी कैलास हांडे व शंकर पोळ यांचा हेतु केवळ या क्षेत्राच्या खरेदीद्वारे शंकर दांगट यांचे क्षेत्रालगत असलेल्या अशोक डुंबरे यांचे क्षेत्र फसवणुकीने, बनावट कागदपत्रे तयार करून व दमदाटी करून बळकावणे व अशोक डुंबरे यांचे इतर अधिकार मुख्यतः विहीर व कांदाचाळ यांची नोंद बोगस पोटखराबा क्षेत्राच्या बनावट ७/१२ उतारा यावर लावून घेवून स्वतः चा फायदा करून घेणे हा होता असे प्रथमदर्शनी तपासात निदर्शनास आले असल्याचे श्री थाटे यांनी सांगीतले.
यातील आरोपी कैलास देवराम हांडे व शंकर गणपत पोळ यांनी सदर गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणुन मा. सत्र न्यायालय खेड यांचेकडे अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी अर्ज केला होता.मात्र न्यायालयाने दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामिन नाकारला.सदर गुन्ह्याचा पुढिल तपास एपीआय लहू थाटे हे करत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img